चहा पित सिगारेटचा धूर काढायला आवडतो? आताच थांबवा हा प्रकार, नपुंसकत्वासह हे 9 आजार ओढावतील

Last Updated:

अनेकदा लोक त्यांच्या डोक्यावरील टेंशन कमी करण्यासाठी चहा आणि सिगारेट यांचे सेवन करतात. तुम्हीही त्यातील एक आहात का?

अनेकदा लोक त्यांच्या डोक्यावरील टेंशन कमी करण्यासाठी चहा आणि सिगारेट यांचे सेवन करतात. तुम्हीही त्यातील एक आहात का?
अनेकदा लोक त्यांच्या डोक्यावरील टेंशन कमी करण्यासाठी चहा आणि सिगारेट यांचे सेवन करतात. तुम्हीही त्यातील एक आहात का?
चहा आणि सिगारेट हे कित्येकांचे आवडते कॉम्बिनेशन आहे. चहाचा घोट घेत सिगारेट पिताना तुम्ही कितीतरी लोकांना पाहिलं असेल. पण हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. चहा आणि सिगारेट या दोन्हीही गोष्टी आरोग्यासाठी घातक मानल्या गेल्या आहेत. अशातच दोघांचे एकत्र सेवन केल्याने प्रकरण आणखीनच बिघडू शकते. असे केल्याने कोणकोणत्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते पाहूयात.
अनेकदा लोक त्यांच्या डोक्यावरील टेंशन कमी करण्यासाठी चहा आणि सिगारेट यांचे सेवन करतात. तुम्हीही त्यातील एक आहात का? असे करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. आज आपण जाणून घेऊया, चहा आणि सिगारेट यांचे एकत्र सेवन आरोग्यासाठी कशाप्रकारे अपाय करू शकते.
२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन' या जर्नलच्या एका अहवालात म्हटले आहे की, गरम चहा अन्ननलिकेच्या पेशींसाठी धोकादायक ठरू शकतो. चहासोबत ओढल्याने नुकसान होण्याचा धोका दुपटीने वाढतो. ही सवय दीर्घकाळ राहिल्यास कर्करोगही होऊ शकतो.
advertisement
Sexual Health : कितीही आवडत असतील तरीही नवविवाहित लोकांनी खाऊ नयेत या गोष्टी, नंतर होईल पश्चाताप
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये कॅफिन आढळते, ज्यामुळे पोटात एक प्रकारचे ऍसिड तयार होते, जे पचनास मदत करते. परंतु जेव्हा या कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा ते पोटाला नुकसान पोहोचवू शकते. त्याच वेळी, सिगारेटमध्ये निकोटीन आढळते. रिकाम्या पोटी चहा आणि सिगारेट एकत्र घेतल्यास डोकेदुखी किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एका अहवालानुसार, सिगारेट ओढणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ७ टक्के जास्त असतो. त्यांचे वय १७ वर्षांपर्यंत कमी होऊ शकते.
advertisement

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्यामुळे कोणते आजार होतात?

1. हृदयविकाराचा धोका
2. अन्ननलिका कर्करोग
3. घशाचा कर्करोग
4. फुफ्फुसाचा कर्करोग
5. नपुंसकत्व आणि वंध्यत्वाचा धोका
6. पोटात व्रण
7. हात आणि पायांचे व्रण
8. स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका
9. ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका
10. वय कमी होते
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चहा पित सिगारेटचा धूर काढायला आवडतो? आताच थांबवा हा प्रकार, नपुंसकत्वासह हे 9 आजार ओढावतील
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement