तणावामुळे कमी होतो हॅप्पी हार्मोन, स्वत:ला ठेवायचंय रिलॅक्स तर या 2 गोष्टी करा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अशा परिस्थितीत मसाज ही एक अशी पद्धत आहे, जी केवळ लोकांचा ताणच नाही तर लोकांना जादूसारखी सकारात्मक ऊर्जा देखील देते.
उधव कृष्ण, प्रतिनिधी
पाटणा, 12 डिसेंबर : शारिरीक त्रास असो किंवा मग मानसिक, दोघांसाठी मालिश हा एक चांगला उपाय आहे, असे सर्वांना वाटते. पण असे फक्त लोकांनाच नाही तर थेरपी तज्ञ मानतात. स्ट्रेसमुळे हॅप्पी हार्मोन कमी होतो. त्यामुळे दोन मसाज या हिवाळ्यात खूप बेस्ट आहेत.
पाटणाच्या गांधी मैदान ट्विन टॉवरवर स्थित असलेल्या द ग्रेस स्पाचे मॅनेजर आणि थेरेपी एक्सपर्ट शुभम यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आजकाल सर्वच क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे. प्रगतीसाठी लोक आपल्या कामात सर्वस्व देतात आणि मनाप्रमाणे यश न मिळाल्याने लोक विनाकारण तणाव घेऊ लागतात. अशा परिस्थितीत मसाज ही एक अशी पद्धत आहे, जी केवळ लोकांचा ताणच नाही तर लोकांना जादूसारखी सकारात्मक ऊर्जा देखील देते.
advertisement
मसाजसाठी काय आहे चार्ज -
शुभम कुमार यांनी सांगितले की, मसाजच्या प्रकारानुसार आणि वेळेनुसार शुल्क ठेवले जाते. सामान्य मसाजचे शुल्क 1,000 रुपयांपासून सुरू होते. अरोमा थेरपी, बांबू आणि हर्बल पोतली मसाज यांसारख्या विशेष मसाजचे शुल्क 1,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाने महिन्यातून किमान एक किंवा दोनदा मसाज केला पाहिजे.
मसाजचे इतरही अनेक फायदे आहेत. जसे की, शरीराच्या खराब झालेल्या ऊतींना दुरुस्त करण्यात देखील मसाज उपयुक्त ठरते. याशिवाय सुगंध आणि बांबूचा मसाज तुमच्या शरीरासोबतच तुमचे मनही ताजेतवाने करते.
advertisement
हिवाळ्यात महिलांसाठी मसाज महत्त्वाची -
view commentsमसाज एक्सपर्ट पुष्पा यांनी सांगितले की, महिलांमध्ये 30 वर्षानंतर हाडांशी संबंधित आजार होऊ लागतात. विशेषत: हिवाळ्यात महिलांमध्ये कंबर, पाठ आणि गुडघेदुखीची समस्या दिसून येते. त्यामुळे विशेषतः महिलांनी मसाजचा अवलंब करावा. सामान्य मसाजला 45 मिनिटे लागतात, तर पोतली आणि बांबूच्या मसाजला सव्वा तास लागतो.
Location :
Patna,Bihar
First Published :
Dec 12, 2023 10:28 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तणावामुळे कमी होतो हॅप्पी हार्मोन, स्वत:ला ठेवायचंय रिलॅक्स तर या 2 गोष्टी करा








