advertisement

Astrology : या 6 राशीच्या व्यक्तींना होतो 'पाचू' धारण केल्याचा फायदा; कोणी घालावे, कोणी नाही? जाणून घ्या धारण करण्यापूर्वीचे नियम

Last Updated:

पाचू बुध ग्रहाशी संबंधित असून, हे ग्रहदोष कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. वृषभ, मिथुन, कन्या, तुला, मकर व कुंभ राशींच्या लोकांनी हे रत्न धारण करावे. मात्र, कुंडलीत बुध ग्रह तिसरा, सहावा, आठवा, किंवा बाराव्या स्थानात असेल तर पाचू धारण करणे टाळावे.

News18
News18
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष असल्यास व्यक्तीला अनेक समस्या भोगाव्या लागतात. या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी संबंधित ग्रहाचे रत्न धारण घालण्याची परंपरा आहे. रत्नशास्त्रात 9 रत्नांचा उल्लेख आहे, त्यातील एक म्हणजे 'पाचू' जे बुध ग्रहाशी संबंधित आहे. असे म्हणतात की, जर आपल्या कुंडलीत बुध कमजोर असेल, तर पाचू धारण करणे फायदेशीर ठरते.
पाचू रत्न व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते. परंतु हे रत्न कोणी धारण करावे आणि कोणी नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्येक रत्न धारण करण्यासाठी काही नियम असतात. भोपाळचे ज्योतिषाचार्य आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून हे जाणून घेऊया...

कोण धारण करू शकतो आणि कोण नाही?

ज्योतिषानुसार वृषभ, मिथुन, कन्या, तुला, मकर, कुंभ राशी आणि कन्या, मिथुन लग्नाच्या व्यक्तींनी पाचू धारण करणे शुभ मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल किंवा बुधाच्या महादशा अथवा अंतरदशेत असाल तर पाचू धारण करावे.
advertisement
परंतु, ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह तृतीय, सहावा, आठवा किंवा 12वा भावात असेल त्यांनी हे रत्न चुकूनही धारण करू नये, कारण यामुळे आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

पाचू धारण करण्याचे नियम

  • पाचूचे वजन : पाचू रत्न कमीत कमी 2 रत्तीचे असावे.
  • धारण करण्याचे धातू : हे रत्न नेहमीच सोने किंवा चांदीच्या अंगठीत बसवून धारण करावे.
  • शुद्धीकरण : हे धारण करण्यापूर्वी एक रात्र गंगाजल, मध, खडीसाखर आणि दुधाच्या मिश्रणात ठेवावे.
  • कोणत्या बोटात धारण करावे : पाचू रत्न नेहमी हाताच्या छोट्या बोटात धारण करावे.
  • मंत्रजप : पाचू धारण करण्यापूर्वी 'ॐ बुम् बुधाय नम:' हा मंत्र 108 वेळा जपावा.
advertisement
याप्रमाणे योग्य नियमांचे पालन करून पाचू रत्न धारण केल्यास लाभ प्राप्त होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Astrology : या 6 राशीच्या व्यक्तींना होतो 'पाचू' धारण केल्याचा फायदा; कोणी घालावे, कोणी नाही? जाणून घ्या धारण करण्यापूर्वीचे नियम
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement