तरैया: गणेश विसर्जनानंतर 9 दिवस चालतो मुलींचा उत्सव; शेणातून साकारतात कलाकृती
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
'तरैया' हा एक प्राचीन आणि खास खेळ आहे. गणेश विसर्जनानंतर 9 दिवस मुली हा खेळ खेळतात. घराच्या दर्शनी भागात शेणापासून कलाकृती साकारल्या जातात.
advertisement
धीरसेन राजपूत
फिरोजाबाद:आपल्या देशात अनेक प्रकारच्या संस्कृती, प्रथा, परंपरा नांदतात. पावला पावलावर भाषा बदलते तशा या परंपराही बदलतात. उत्सव आणि सणांमधून या वैविध्यपूर्ण परंपरांचं दर्शन होत असतं. उत्तर प्रदेशातील काही भागात अशीच एक अनोखी परंपरा आजही जपली जाते.
फिरोजाबादच्या ग्रामीण भागात गणेश विसर्जनानंतर एक अनोखा खेळ मुली खेळतात, ज्याला "तरैया" असे म्हणतात. या खेळात मुली शेणातून सुंदर आकृत्या तयार करतात आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करतात.
advertisement
गोबरच्या आकृत्यांचा प्राचीन खेळ
गावांमध्ये लहान मुलांना विविध खेळ खेळताना पाहिले जाते, पण "तरैया" हा एक प्राचीन आणि खास खेळ आहे. मुलं-मुली गोबर जमा करून त्यातून विविध आकृत्या बनवतात आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ त्यापासून चित्र साकारतात.
गणेश विसर्जनानंतर सुरू होणारी परंपरा
तरैया हा खेळ गणेश विसर्जनानंतर सुरू होतो. त्यादिवशी संध्याकाळी मुली शेणाच्या आकृत्या बनवायला सुरुवात करतात. हे खेळ 9 दिवस चालतो आणि नंतर या आकृत्यांचे विसर्जन केले जाते.
advertisement
"तरैया" मुलींमध्ये अधिक लोकप्रिय
फिरोजाबादच्या ग्रामीण भागात "तरैया" हा खेळ मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. मुली या खेळात भाग घेऊन शेणापासून तयार केलेल्या आकृत्यांना आकर्षक फुलांनी सजवतात आणि आनंद घेतात.
Location :
Firozabad,Uttar Pradesh
First Published :
September 24, 2024 8:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तरैया: गणेश विसर्जनानंतर 9 दिवस चालतो मुलींचा उत्सव; शेणातून साकारतात कलाकृती


