फक्त 30 रूपयांत मुंबईमध्ये 'या' ठिकाणी मिळतोय बटर चिकन पाव; एकदा खाऊन तर पाहा, बोटं चाखत राहाल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
दादरमधील 'फूड्स माफिया' या फूड स्टॉलवर आपल्याला एक चविष्ट आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले बटर चिकन पाव आणि विविध स्वादिष्ट फूड्सचा अनुभव मिळतो. मुंबईमध्ये पहिला बटर चिकन पाव यांनीच विकण्यास सुरुवात केली.
मुंबई: दादरमधील 'फूड्स माफिया' या फूड स्टॉलवर आपल्याला एक चविष्ट आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले बटर चिकन पाव आणि विविध स्वादिष्ट फूड्सची चव चाखायला मिळते. मुंबईमध्ये पहिला बटर चिकन पाव यांनीच विकण्यास सुरुवात केली. या स्टॉलवर 30 रुपयांमध्ये बटर चिकन पाव मिळतो ज्यामध्ये ताजं चिकन आणि मऊ पाव तुम्हाला मिळतो. तसेच स्पेशल बटर चिकन पावमध्ये सॉस, चाट, चिकन स्टिक, आणि ताजं सलाड यांचा समावेश असतो आणि याची किंमत 50 रूपये इतकी आहे.
'फूड्स माफिया'चा खास 'स्पेशल किंग चिकन पाव' आणि 'स्पेशल किंग चिकन रोल' हे दोन प्रमुख डिशेस आहेत. 'स्पेशल किंग चिकन पाव' 70 रुपयांना आणि 'स्पेशल किंग चिकन रोल' 100 रुपयांना मिळतो. हे पदार्थ खास ग्राहकांसाठी बनवले जातात आणि त्यात भरपूर चव आहेत. 'किंग चिकन रोल' खाल्ल्यावर तुमचा 100% पोठ भरेल असं ते म्हणतात. 'फूड्स माफिया' मध्ये 20 ते 25 प्रकारच्या रोल्स आणि पाव मिळतात ज्यांची किंमत 25 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत असते. यामध्ये चिकन स्टिक, चिकन रोल, चिकन पाव, एग रोल असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
जर तुम्हाला पार्टी ऑर्डर देण्याची इच्छा असेल तर 'फूड्स माफिया' तुम्हाला ते देखील तत्परतेने पुरवतो. हे ठिकाण दादर ईस्ट स्टेशनपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि हे स्टॉल दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत खुलं असतं. त्यामुळे जेव्हा तुमचं भुकेलं मन चविष्ट आणि ताजं काहीतरी शोधत असेल, तेव्हा 'फूड्स माफिया' एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/Food/
फक्त 30 रूपयांत मुंबईमध्ये 'या' ठिकाणी मिळतोय बटर चिकन पाव; एकदा खाऊन तर पाहा, बोटं चाखत राहाल

