advertisement

Coconut Ice Cream : नारळ पाणी तर नेहमीच पिता, आता बनवा शहाळ्याचं आईस्क्रीम! पाहा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी..

Last Updated:

Coconut Ice Cream Recipe In Marathi : उन्हाळयात आपल्याला थंड काहीतरी खायची इच्छा तर होतेच, अशावेळी जर आपल्याला शहाळ्याचं हेल्दी आणि टेस्टी आईस्क्रीम खायला मिळालं तर..

या पद्धतीनं बनवा शहाळ्याचं आईस्क्रीम..
या पद्धतीनं बनवा शहाळ्याचं आईस्क्रीम..
मुंबई : उन्हाळ्यात शहाळ्याचं पाणी सर्वचजण पितात. ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीरही असतं. शहाळ्याच्या पाण्यामुळे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर राहतात. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन, सनस्ट्रोक अशा त्रासांचा सामना करावा लागत नाही. पण रोज रोज शहाळं पिऊन आपण बोअर होऊ शकतो.
उन्हाळयात आपल्याला थंड काहीतरी खायची इच्छा तर होतेच अशावेळी जर आपल्याला शहाळ्याचं आईस्क्रीम खायला मिळालं तर.. आज आम्ही तुम्हाला शहाळ्याच्या आईस्क्रीमची भन्नाट रेसिपी सांगता आहोत. ही रेसिपी aamhi_malvani_15 या इंस्टाग्राम चॅनलवर दिली गेली आहे. ही आईस्क्रीम बनवणं अत्यंत सोपं आहे आणि झटपट बनेल. फक्त आईस्क्रीम सेट होण्यासाठी तुम्हाला थोडा वसलं द्यावा लागेल.
advertisement
शहाळ्याचं आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य..
- शहाळं
- ओलं नारळ
- साखर
- फ्रेश क्रीम किंवा दुधाची मलाई
- काजू
या पद्धतीनं बनवा शहाळ्याचं आईस्क्रीम..
- सर्वात आधी शहाळ्यातलं पाणी एका बाजूला काढून घ्या.
- त्यानंतर ओला नारळ घ्या किंवा शहाळ्याची मलाई घ्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करा.
- त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्या आणि यामध्ये शहाळ्याचं पाणी टाका.
advertisement
- शहाळ्याच्या पाण्यामध्ये नारळ किंवा शहाळ्याची मलाई टाका.
- यामध्येच साखर, फ्रेश क्रीम किंवा दुधाची मलाई आणि काजू टाका.
- आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्या. याची अगदी गुळगुळीत पेस्ट बनवा.
- तयार पेस्ट नारळाच्या वाट्यांमध्ये भरा किंवा कोणत्याही आईस्क्रीम ट्रेमध्ये भरा.
- यानंतर आईस्क्रीम सेट होण्यासाठी 6 तास फ्रिजरमध्ये ठेवा.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Aamhi malvani (@aamhi_malvani_15)



advertisement
अशाप्रकारे तुम्ही हेल्दी आणि टेस्टी आईस्क्रीम घरीच बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त साहित्यही लागत नाही आणि खूप कमी वेळेच्या पूर्वतयारीमध्ये हे आईस्क्रीम बनून तयार होतं. शिवाय मुलांसाठीही हा खूप चांगला आणि हेल्दी पर्याय आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Coconut Ice Cream : नारळ पाणी तर नेहमीच पिता, आता बनवा शहाळ्याचं आईस्क्रीम! पाहा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी..
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement