Zubeen Garg: बॉडीमध्ये अल्कोहोल, यॉचवर बेफिकीरपणा.. झुबीन गर्गच्या मृत्यूवर सिंगापूर कोर्टाचा मोठा निर्णय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zubeen Garg Death: १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरच्या लाझारस आयलंडवर झुबीन यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भारत हळहळत होता.
advertisement
झुबीन एका कार्यक्रमासाठी त्यांच्या संपूर्ण टीमसह सिंगापूरला गेले होते. अशातच एका बेटावर मित्रांसह मजामस्ती करायला गेले असताना त्यांच्यासोबत दुर्दैवी अपघात झाला आणि पाण्यात पोहायला उतरलेल्या झुबीन यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अशातच सिंगापूरच्या कोर्टाने या प्रकरणावर आपला अंतिम निर्णय दिला आहे.
advertisement
झुबीन यांच्या मृत्यूनंतर देशात दुःखाची लाट आली होती. आसाम सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय दुखवटाही पाळला होता. प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने त्यांच्या मॅनेजरसह ७ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच सिंगापूरच्या कोर्टाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू हा कोणताही घातपात नसून तो एक दुर्दैवी अपघात असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
पहिल्यांदा पोहायला गेल्यावर त्यांनी जॅकेट काढले आणि दुसऱ्यांदा जॅकेटशिवायच समुद्रात उडी मारली. ज्यावेळी झुबीन दुसऱ्यांदा समुद्रात पोहत होते, तेव्हा ते लाझारस आयलंडच्या दिशेने जात होते. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना प्रचंड थकवा जाणवला असावा, कारण त्यांनी अचानक यॉटच्या दिशेने परत पोहायला सुरुवात केली.
advertisement
advertisement
advertisement







