advertisement

जगात सर्वात स्वस्त जेवण कुठे मिळतं? 'या' यादीत भारत कितव्या क्रमांकावर? पाहा टॉप 10 देशांची यादी

Last Updated:

cheapest countries for groceries 2026, Cost of Living Index India rank, food prices in India vs USA, Pakistan lowest food index score, global inflation impact on food, India 6th cheapest country for food, reasons for low food prices in India, New York vs India grocery cost comparison,

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : आजच्या काळात घराबाहेर पडलं की खिशाला कात्री लागतेच. सकाळीच्या चहा नाष्टापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडल्याचं आपल्याला जाणवतं. मध्य पूर्व आशियातील तणाव आणि जागतिक मंदीमुळे जगभरात महागाईने डोकं वर काढलं आहे. हल्ली किराणा भरणं सुद्धा कठीण झालंय, पण तुम्हाला माहीत आहे का? जगाच्या नकाशावर असेही काही देश आहेत जिथे आजही पोटाची खळगी भरण्यासाठी खूप कमी पैसे मोजावे लागतात.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'जीवन निर्वाह लागत सूचकांक' (Cost of Living Index) अहवालात एक धक्कादायक पण रंजक माहिती समोर आली आहे. या जागतिक यादीत भारताचं स्थान नेमकं कुठे आहे? आणि सर्वात स्वस्त किराणा कोणत्या देशात मिळतो? जाणून घेऊया सविस्तर.
पाकिस्तान यादीत अव्वल; पण नेमकं कारण काय?
या यादीत शेजारील पाकिस्तान चक्क पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा खाद्य मूल्य निर्देशांक स्कोअर केवळ 17.2 इतका आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तिथे तर महागाई प्रचंड आहे, मग स्वस्त कसं?
advertisement
डॉलरचं गणित:
हा निर्देशांक अमेरिकन डॉलरमध्ये मोजला जातो. पाकिस्तानी रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यामुळे, जागतिक स्तरावर तिथल्या अन्नाच्या किमती डॉलरमध्ये मोजल्यास त्या सर्वात कमी भरतात. पाकिस्ताननंतर अफगाणिस्तान 17.3 दुसऱ्या, इजिप्त 19.7 तिसऱ्या आणि इराण 20.08 चौथ्या क्रमांकावर आहे.
स्वस्त देशांच्या यादीत भारताची मोठी झेप
भारतासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, जगात सर्वात स्वस्त किराणा मिळणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा किराणा निर्देशांक स्कोअर 22.5 इतका आहे. न्यूयॉर्क शहराच्या तुलनेत भारतात खाद्यपदार्थ आणि पेये तब्बल 77.5% स्वस्त आहेत. जरी आपण पहिल्या क्रमांकावर नसलो, तरी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा विचार करता, भारतात दैनंदिन गरजांच्या वस्तूंच्या किमती आजही सामान्यांच्या आवाक्यात आहेत.
advertisement
भारतात किमती कमी का आहेत?
विकसित देशांच्या तुलनेत भारतात अन्नधान्य स्वस्त मिळण्यामागे तीन मुख्य कारणं आहेत:
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने धान्य, फळे आणि भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात शेती आणि वाहतुकीसाठी लागणारा मजुरीचा खर्च कमी आहे.
रेशनिंग व्यवस्था आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार अन्नधान्याचे योग्य वितरण सुनिश्चित करते, ज्यामुळे किमती नियंत्रणात राहतात.
advertisement
कसा मोजला जातो हा इंडेक्स?
या निर्देशांकाची गणना जास्तीत जास्त 100 डॉलरच्या दराने केली जाते. म्हणजे ज्या देशाचा स्कोअर 100 च्या जितका जवळ, तिथे महागाई तितकी जास्त आणि ज्याचा स्कोअर कमी, तिथे जेवण तितकं स्वस्त. भारताचा 22.5 स्कोअर हे दर्शवतो की भारतीयांना त्यांच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा अन्नावर खर्च करावा लागत नाही, जो इतर देशांत करावा लागतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
जगात सर्वात स्वस्त जेवण कुठे मिळतं? 'या' यादीत भारत कितव्या क्रमांकावर? पाहा टॉप 10 देशांची यादी
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement