'हाऊस ऑफ क्रेव्हिंग्स', इथं तरुणांसोबत मोठ्यांचीही गर्दी! नेमकं आहे तरी काय?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Piyush Patil
Last Updated:
इथं व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये अनेक हटके पर्याय मिळतात. जसं की, बबल टी, कुल्हड पिझ्झा, पराठा हाऊस, शोरमा, मिल्क शेक, इत्यादी.
पियुष पाटील, प्रतिनिधी
कल्याण : कधीकधी आपल्याला एकाच वेळी अनेक पदार्थ खावेसे वाटतात. मग हे खाऊ की, ते खाऊ काही कळत नाही. अशा सर्व खवय्यांसाठी 'हाऊस ऑफ क्रेव्हिंग्स' हे बेस्ट ठिकाण आहे. इथं लहान लहान वेगवेगळे फूड स्टॉल्स आहेत. कॅफे लूकमुळे हाऊस ऑफ क्रेव्हिंग्स अगदी एखाद्या मॉलमधलं फूड कोर्ट वाटतं.
आपण कुटुंबियांबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर बाहेर लंच, डिनर किंवा इव्हिनिंग स्नॅकसाठी गेलो तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. परंतु एका ठिकाणी जे काही मिळेल तेच सर्वांना खावं लागतं. हीच सर्वांची आवडनिवड लक्षात घेऊन हाऊस ऑफ क्रेव्हिंग्स सुरू करण्यात आलं.
advertisement
हेही वाचा : फरसाणपासून ते वेफर्सच्या अनेक व्हरायटी, 10 रुपयांपासून करा खरेदी, दिव्यात फेमस आहे दुकान
इथं व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये अनेक हटके पर्याय मिळतात. जसं की, बबल टी, कुल्हड पिझ्झा, पराठा हाऊस, शोरमा, मिल्क शेक, इत्यादी. महत्त्वाचं म्हणजे कल्याणमध्ये असलेल्या या हाऊस ऑफ क्रेव्हिंग्समध्ये केवळ तरुणमंडळी नाही, तर सिनियर सिटिझन्सही हौशीनं येतात.
advertisement
'दर शनिवार, रविवारी इथं खूप गर्दी असते. आम्हाला स्वतःला पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. कॉलेजमधील मुलं, बॅचलर्स, ऑफिस पार्टीसाठी लोक याठिकाणाला पसंती देतात', असं हाऊस ऑफ क्रेव्हिंग्सच्या प्रमुख धारा लाड यांनी सांगितलं.
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
July 04, 2024 4:02 PM IST