Shegaon Kachori : तुम्हाला माहितीये का शेगाव कचोरी फेमस कशी झाली? झणझणीत कचोरी मागचं गुपित नेमकं काय? Video

Last Updated:

शेगाव हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर तेथील कचोरी देखील तितकीच फेमस आहे. शेगावला गेलेत आणि शेगावची झणझणीत कचोरी चाखली नाही असं कधीच होत नाही. मग ही आवडीने खाणारी कचोरी शेगावात नेमकी आली कशी? याबाबत माहिती जाणून घेऊ. 

+
News18

News18

अमरावती : विदर्भातील शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. त्याठिकाणी विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. शेगाव हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर तेथील कचोरी देखील तितकीच फेमस आहे. शेगावला गेलेत आणि शेगावची झणझणीत कचोरी चाखली नाही असं कधीच होत नाही. त्याठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती शेगाव कचोरी घेऊन जातो. आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की, शेगाव कचोरी इतकी फेमस का असेल? नेमकी त्याची खासियत काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कचोरी नेमकी शेगाव येथे आली कशी? याबाबत माहिती जाणून घेऊ.
शेगावात कशी आली कचोरी?
मिळालेल्या माहितीनुसार, भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या तिरथराम शर्मा यांनी दिल्लीत आपल्या उदरनिर्वाहासाठी कचोरीचे स्टॉल सुरू केले होते. त्याठिकाणी त्यांचं हे काम सुरू असताना रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनचे टेंडर निघाले होते. त्यांनी विदर्भातील शेगाव येथील रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनसाठी टेंडर भरले होते. त्यांना ते काम मिळाले, आणि 1950 च्या आसपास तिरथराम शर्मा शेगाव रेल्वे स्टेशनला कॅन्टीनचे काम सुरू केले. त्याठिकाणी तिरथराम शर्मा यांनी बनवलेली झणझणीत कचोरी तेथील लोकांना आवडू लागली. त्यानंतर कचोरीला शेगाव कचोरी असे देण्यात आले.
advertisement
कचोरीच्या चवीत काहीसा बदल
त्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविक या कचोरीचा आस्वाद घेऊ लागले. हळूहळू तिरथराम शर्मा यांनी कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी त्यांनी बेसन पीठ वापरले आणि विदर्भातील लोकांना आवडेल अशा प्रमाणात ते कचोरी बनवू लागलेत्यानंतर ही कचोरी झपाट्याने फेमस होऊ लागली. त्यानंतर काही वर्षात ही कचोरी फक्त विदर्भच नाही तर महाराष्ट्रातील विविध भागांत पोहोचलीशेगावला येणाऱ्या भाविकांनी ही कचोरी परदेशातही पोहोचवलीबाहेरील देशात हे पार्सल घेऊन जाण्यासाठी त्यांनी फ्रोझन कचोरी बनवली. जी बाहेर 5 दिवस आणि फ्रिजमध्ये 15 ते 20 दिवस टिकते.
advertisement
चविष्ट अशा कचोरीचं गुपित काय?
तीरथराम शर्मा याच्या नवीन पिढीने सुद्धा हा व्यवसाय पुढे सुरूच ठेवला. त्यांनी काळानुरूप अनेक बदल केलेत मात्र चव ही जशीच्या तशी ठेवली. शर्मा यांच्या या चविष्ट आणि झणझणीत कचोरी मागचं नेमकं गुपित काय? तर ते म्हणजे त्यातील मसाला. शर्मा यांच्या 5 मुलांकडून 16 नातवंडांकडे या मसाल्याची रेसिपी आली. घरातील लोकांच्या व्यतिरिक्त ही कचोरी बनवण्यात ते कोणालाही सामील करून घेत नाहीत. त्याचबरोबर त्यांची रेसिपी ते कोणाला सांगत सुद्धा नाहीत. श्री संत गजानन महाराजांच्या भूमीतून आता ही शेगाव कचोरी विविध भागांत पोहोचत आहेतिरथराम शर्मा यांच्या कचोरीची चव आणि इतर बाबी बघून त्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. कोणी विचारही करू शकणार नाही, असा हा शेगाव कचोरीचा प्रवास आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
Shegaon Kachori : तुम्हाला माहितीये का शेगाव कचोरी फेमस कशी झाली? झणझणीत कचोरी मागचं गुपित नेमकं काय? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement