चिकन बिर्याणी विसरा, कधी चिकन भेळ खाल्ली का? जबरदस्त आहे टेस्ट Video

Last Updated:

वेगवेगळ्या प्रकारच्या भेळचा तुम्ही आता पर्यंत आस्वाद घेतलेला असेल. पण आता ठाण्यात चिकन भेळ खायला मिळेल.

+
News18

News18

ठाणे, 25 डिसेंबर : वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेकांना आवडतं. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते. आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या चाट भेळ, सुका भेळ, फरसाण भेळ खाल्ल्या असतील पण कधी चिकन भेळ खाल्ली आहे का? नाही ना? तर हीच भेळ आता तुम्हाला ठाण्यातील ऐका स्टॉलवर खायला मिळेल. ही चिकन भेळ खाण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करत आहेत.
कुठे मिळतीय भेळ?
ठाण्याच्या अष्टविनायक चौकातील स्वादिष्ट नामक या नॉनव्हेज स्टॉलवर चिकन भेळ मिळत आहे. या स्टॉलचे मालक ऋषभ दत्तात्रय पवार आहेत. आजवर फक्त सुका भेळ खाणाऱ्या खवय्यांसाठी ही चिकन भेळ युनिक पदार्थ ठरत आहे. या चिकन भेळची किंमत 70 रुपये आहे. नॉनव्हेज लव्हर खवय्यांच्या अतिशय आवडीच्या या स्टॉलवर चिकन भेळ नामक पदार्थ खवय्यांचे आता मन जिंकत आहे. या चिकन भेळची टेस्ट जबरदस्त आहे. 
advertisement
70 रुपयात मिळणाऱ्या या भेळीचे खास वैशिष्ट्य म्हणजेच यात तळलेले चिकन वापरले जाते. ही भेळ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. शिजलेल्या चिकनचे बारीक तुकडे मक्याच्या पिठात बुडवून तळून घ्यावे. चिकन तळून झाल्यास त्यांचे आणखीन बारीक काप करावे. गरम तवा घेऊन त्यात अंदाजे तेल घ्यावे. कोबी परतून त्यात ड्राय नूडल्सची शेव आणि चिकनचे काप घ्यावेत. त्यावर शेजवान सॉस, चिल्ली सॉस, सोया सॉस घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. शेवटी कोथिंबीर घालून ते प्लेटवर सर्व्ह करावे,अशी माहिती या स्टॉलचे मालक ऋषभ दत्तात्रय पवार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चिकन बिर्याणी विसरा, कधी चिकन भेळ खाल्ली का? जबरदस्त आहे टेस्ट Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement