नोकरी की आवड? पंकजने निर्णय घेतला, आता महिन्याला 150000 ची कमाई, नेमकं केलं काय?

Last Updated:

Food Business: पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाने नोकरी सोडून आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. आता तो केक विकून महिन्याला दीड लाखांची कमाई करतोय.

+
नोकरी

नोकरी की आवड? पंकजने निर्णय घेतला, आता महिन्याला 150000 ची कमाई, नेकमं केलं काय?

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आवड ही असतेच. आपली आवडच कधी कधी आपली ओळख बनून जाते. पुण्यातील बावधन येथे राहणारे पंकज कारागीर यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून बावधन येथे चिझ केकचा व्यवसाय सुरु केला. यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर चिझ केक बनवत असून या सोबतच ब्राऊनी देखील विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून पंकजने आपल्या व्यवसायाबाबत माहिती दिलीये.
advertisement
पंकज मूळचा छत्रपती संभाजी नगरचा असून 4 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आला. ऑरगॅनिक केमेस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ याच क्षेत्रात काम देखील केलं. घरापासून राहण्यास लांब असल्यामुळे तो घरीच जेवण बनवायचा. त्यामुळे पंकजला जेवण बनवण्याची आवड निर्माण झाली. त्याने क्लाऊड किचन देखील सुरु केले. सहा महिने हे क्लाउड किचन सुरू होते. पण त्यासाठी जास्त भांडवल लागत असल्यामुळे दुसरा व्यवसायाचा विचार सुरू झाला.
advertisement
कशी झाली सुरुवात?
पुढे पंकज हा स्वत: एक महिना चिझ केकची रेसिपी ट्राय करत होता. काही दिवपसांनी चिझ केक चांगल्या पद्धतीनं बनवण्यास येऊ लागला. बावधन येथेच चिझ केकचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवात दोन केकपासून केली. या केकला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आणि हे केक लगेच संपले. तेव्हा याच क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय झाला. आता गेल्या वर्षभरातपासून पंकज हा चिझ केकची विक्री करतोय. यातून त्याला चांगली कमाई देखील होतेय.
advertisement
10-15 फ्लेवरचे केक
वर्षभरापूर्वी 2 केकपासून सुरुवात केली होती. आता 10 ते 15 प्रकारचे फ्लेवर चिझ केक बनवून विकतो. यामध्ये बेलझियम चॉकलेट, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, मँगो, रसबेरी, ओरिओ चिझ केक, नटेला चिझ केक उपलब्ध आहेत. याला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. सुरुवात केली तेव्हा दोन केक हे एक ते दीड तासात संपले होते. चव चांगली असल्यामुळे लोक आवर्जून येतात. 140 रुपयेला एक पेस्ट्री या प्रमाणे विक्री करतो. तर साधारण महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची विक्री होते, अशी माहिती पंकज कासगीर याने दिली.
मराठी बातम्या/Food/
नोकरी की आवड? पंकजने निर्णय घेतला, आता महिन्याला 150000 ची कमाई, नेमकं केलं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement