फक्त 15 रुपयांत होतेय गरिबांची न्याहरी, सोलापूरच्या फेमस दाल चावलची टेस्टच लय भारी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात अगदी स्वस्तात न्याहरी होते. याठिकाणी फक्त 15 रुपयांत प्रसिद्ध दाल चावल मिळते.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - सोलापूर शहर कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात कामगारांची मोठी वस्ती असून त्यांच्या खिशाला परवडतील असे खाद्य पदार्थ या शहरात पहायला मिळतात. त्यापैकीच एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे दाल चावल. सोलापूर शहरात दाल चावल मिळणारी अनेक ठिकाणे आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर वलीचंद बागवान यांचं चाचा दाल चावल या नावाने हॉटेल आहे. याठिकाणी सकाळच्या न्याहरीला दाल चावल खाण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते.
advertisement
फक्त 15 रुपयांना मिळतोय दाल चावल
सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या कामगारांना अगदी स्वस्त दरात हा दाल चावल उपलब्ध होतो. दाल चावलचा एक प्लेट 15 रुपयाला मिळते. या प्लेटमध्ये राईस आणि दाळ असते. यासोबत लिंबू आणि कांदा देखील दिला जातो. दाल चावलची चव आणखीन वाढावी म्हणून सोबतच मिरची भजी, कांदा भजी, दाल वडा, कांदा समोसे, पालक भजी घेऊन दाल चावल लोक आवडीने खातात. भजीची किंमत सुद्धा गोरगरिबांना परवडेल इतकी म्हणजेच 15 रुपये प्लेट आहे. तर काही कामगार विक्रेत्यांकडून दाल चावल पार्सल सुद्धा घेवून जातात.
advertisement
अनेकांना मिळतोय रोजगार
दाल चावल हे अवघ्या 15 रुपयात जरी मिळत असलं, तरी त्याच्या दर्जात कुठेही कमी पडू दिलं जात नाही. चांगल्या प्रतीचं धान्य वापरून अतिशय स्वच्छ ठिकाणी ते शिजवलं जातं. शिवाय टेबल खुर्च्या लावून व्यवस्थित बसून जेवण्याची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. गोरगरीब लोक, मजूर आणि कामगार वर्ग, रिक्षाचालक हे नेहमीच इथे जेवण्यासाठी येतात. गरीब कामगारांच्या न्याहरीची सोय होत असल्याने या व्यसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. त्याचबरोबर अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 14, 2024 4:58 PM IST
मराठी बातम्या/Food/
फक्त 15 रुपयांत होतेय गरिबांची न्याहरी, सोलापूरच्या फेमस दाल चावलची टेस्टच लय भारी