विदर्भातील मटका रोटी खाल्लीत का? पाहा लंबी रोटीची खास रेसिपी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भात लंबी रोटी, लांब रोटी, मटका रोटी किंवा मांडे या नावाने प्रसिद्ध असणारा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
शुभम अडकने, प्रतिनिधी
नागपूर: प्रत्येक भागाची एक वेगळी खाद्य संस्कृती असते. तसेच त्या त्या ठिकाणचे काही खास पदार्थ प्रसिद्ध असतात. विदर्भात सावजी मटन आणि मांडे किंवा मटका रोटी सारखे पदार्थ प्रसिद्ध आहेत. आपण रोटी, पोळी, चपाती खाल्ली असेल. पण गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी मांडे किंवा लंबी रोटी अनेकांना माहिती नसेल. नागपूर येथील सुनीता बागडे यांनी या लंबी रोटीची रेसिपी सांगितली आहे.
advertisement
विदर्भात लंबी रोटी, लांब रोटी, मटका रोटी किंवा मांडे या नावाने प्रसिद्ध असणारा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. लांब रोटी ही अत्यंत कुरकुरीत आणि चविष्ट असते. विशेषत: ग्रामीण भागात ही रेसिपी आवर्जून बनवली जाते. रुमाली रोटीसारखी दिसणारी ही रोटी पूर्णत: गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. ही पोळी बनविण्यासाठी वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो. ही रोटी तयार करणे म्हणजे कौशल्याचा काम आहे.
advertisement
कशी बनते लांब रोटी?
लांब रोटी बनवण्यासाठी गहू बारीक दळून 15- 20 मिनिटे भिजवून घ्यावं लागतं. मोठ्या परातीत पिठात पाणी टाकत पीठ भिजवलं जातं आणि वारंवार पटकलं जातं. त्यात चिक्की येईपर्यंत पटकलं जातं. नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करुन अलगद माठावर टाकला जातो. भरपूर पाणी वापरून पातळ पीठ तयार केलं जातं. नंतर मातीच्या चुलीवर एक मोठं उलटं माठ ठेवलेलं असतं. महिलांचे कुशल हात कणकेला अत्यंत पातळ रोटी तयार करुन माठाच्या गोलाकार पृष्ठभागावर नाजूकपणे चिकटवल्या जाते. पूर्णपणे शिजल्यानंतर, रोटी काळजीपूर्वक काढून सर्व्ह केली जाते.
advertisement
कशासोबत खाण्यासाठी प्रसिद्ध?
माठावरची लांब रोटी नागपुरात प्रसिद्ध आहे. लोक नॉनव्हेज, पनीर, पाटवडी रस्सा किंवा आमरस आणि इतर चमचमीत पदार्थांसोबत यावर ताव मारतात. लांब रोटी मुख्यत्वे कडकनाथ चिकन आणि मटण सोबत खाल्ली जाते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात या रोट्यांना आंब्याच्या रसासोबत खाण्यास अनेकांची पसंती असते.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 21, 2024 9:41 PM IST








