महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल, किंमत 130 रुपयांपासून, मुंबईत इथं चाखा चव
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सध्या तरुणाई आईस्क्रीम पेक्षा ही चॉकलेट बाऊलला पसंती देताना दिसत आहे. महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल सध्या घाटकोपरमध्ये एका ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या तरुणाई आईस्क्रीम पेक्षा ही चॉकलेट बाऊलला पसंती देताना दिसत आहे. महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल सध्या घाटकोपरमध्ये एका ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये असणारे क्रेव्ह द बाऊल या दुकानात हे सगळे चॉकलेट बाऊल उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये ही कन्सेप्ट नवीन असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असणाऱ्या अक्षय ओझा या मुंबईकर तरुणाने घाटकोपरमध्ये स्वतःचा चॉकलेट बाऊलचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःचा व्यवसाय असावा या उद्देशाने त्याने मर्चंट नेव्हीतील नोकरी सोडून हा युनिक व्यवसाय सुरू केला आणि आता या व्यवसायाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे.
advertisement
सध्या स्ट्रॉबेरीचा सिझन सुरू असल्यामुळे इथे मिळणारे स्ट्रॉबेरी चॉकलेट बाऊल खाण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या स्ट्रॉबेरी चॉकलेट बाऊलमध्ये तुम्हाला चारहून अधिक व्हरायटी मिळतील. ज्यामध्ये चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल, नटेला स्ट्रॉबेरी पाऊल, स्ट्रॉबेरी क्रीम बाऊल आणि लंडन चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन असून पर्सनल बाऊल आणि शेअरिंग बाऊल सुद्धा मिळतील.
advertisement
चॉकलेट बाऊलची किंमत इथे 130 रुपयांपासून सुरू होईल. त्याचबरोबर या क्रीम बाऊलमध्ये तुम्हाला आणखीही व्हरायटी मिळेल. ज्यामध्ये डार्क डिलाईट बाऊल, ट्रिपल चॉकलेट बाऊल, ऑरेंज चॉकलेट बाऊल, मिल्की मिस्टी बाऊल, रेड वेलवेट बाऊल आणि नटेला चॉकलेट बाऊल असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. यांच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वापरले जाणारे सगळे क्रीम त्यासोबतच बेसेस हे त्याच दिवशी बनवलेले असतात. त्यामुळे सगळ्याची चव अगदी फ्रेश लागते.
advertisement
'मी मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे सगळं काही फिरलो, नोकरी केली. तेव्हाच ठरवलं की असा काहीतरी युनिक व्यवसाय करायचा आहे. डेझर्टचा व्यवसाय करायचा होता नंतर विचार केला की आपण चॉकलेट बाऊलचा व्यवसाय करूया. वाटलं नव्हतं की मुंबईकरांचा इतका चांगला प्रतिसाद येईल. पण आता मुंबईकरांचे प्रेम पाहून असा काहीतरी वेगळा विचार केला याबद्दल चांगलंच वाटत आहे' असे अक्षय ओझा यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2025 11:21 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल, किंमत 130 रुपयांपासून, मुंबईत इथं चाखा चव