लग्नात गिफ्ट काय द्यायचं? टेन्शन सोडा, फक्त 50 रुपयांपासून खरेदी करा फ्रेम, अमरावतीत एवढ्या स्वस्तात कुठेच नाही!

Last Updated:

सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी वास्तुपूजा वाढदिवस आणि बरेच प्रसंग असतात. अशावेळी तुम्ही आकर्षक अशा फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

+
Best

Best Gift Option 

प्रगती बहुरूपी, प्रतिनिधी 
अमरावती : सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी वास्तुपूजा, वाढदिवस आणि बरेच प्रसंग असतात. अशावेळी सर्वात मोठा प्रश्न असतो, गिफ्ट काय द्यायचं? त्यावेळी तुम्ही फोटोफ्रेमचा विचार करू शकता. तर अमरावतीमध्ये फोटो फ्रेम खरेदी करायची असल्यास किंवा बनवून घ्यायची असल्यास तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतं गांधी चौक येथील जय अंबे फोटो फ्रेम. यांच्याकडे तुम्हाला पाहिजे तशी फोटो फ्रेम बनवून मिळेल.
advertisement
जय अंबे फोटो फ्रेम येथील त्रिशूल गोरे माहिती देताना सांगतात की, आमच्याकडे होलसेल दरात फोटो फ्रेम बनवून मिळतात. आम्ही स्वतः बनवत असल्याने त्यावर एक्स्ट्रा चार्जेस काहीही लागत नाही. अगदी छोट्या साईजपासून ते तुम्हाला पाहिजे त्या साईजपर्यंतच्या फ्रेम आम्ही बनवून देऊ शकतो. त्याचबरोबर आमच्याकडे उपलब्ध सुद्धा आहेत.
advertisement
50 रुपयांपासून छोट्या फ्रेम
देवी-देवतांच्या छोट्या फ्रेम आमच्याकडे 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यामध्ये फायबरच्या फ्रेम, प्लास्टिक फ्रेम आणि इतरही काही फ्रेम उपलब्ध आहेत. त्यात 150 रुपयांपर्यंत तुम्ही क्वालिटी फ्रेम खरेदी करू शकता. त्याचबरोबर नवनवीन मूर्ती सुद्धा उपलब्ध आहेत, त्यासुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
advertisement
250 रुपयांपासून मोठ्या फ्रेम
सध्या लग्नसराईमध्ये राधा-कृष्ण फ्रेम गिफ्ट देण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार 250 रुपयांपासून फ्रेम आमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला बनवून पाहिजे असल्यास त्या सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो. ग्राहकांच्या पसंती आणि मताप्रमाणे आम्ही फ्रेम पुरवतो. त्यात सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटी आहेत. 250 रुपयांपासून ते 20 हजारपर्यंत फ्रेम आहेत. साईज आणि क्वालिटीनुसार प्राईस वाढत जाते.
advertisement
नवनवीन गिफ्ट ऑप्शन
फक्त फोटो फ्रेमच नाही तर अनेक गिफ्ट ऑप्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, देवाच्या आकर्षक मूर्ती सुद्धा आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू सुद्धा आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, त्यांच्या वेगवेगळे प्रसंग आहेत. काचेच्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर आकर्षक असा हा टोप सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी आमच्या दुकानाचा पत्ता आहे, गांधी चौक, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती नक्की भेट देऊन बघा, असे त्रिशूल यांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नात गिफ्ट काय द्यायचं? टेन्शन सोडा, फक्त 50 रुपयांपासून खरेदी करा फ्रेम, अमरावतीत एवढ्या स्वस्तात कुठेच नाही!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement