लग्न, पार्टीत 500 रुपयांत करा राजेशाही लूक, मुंबईजवळ मिळतात भरजरी कपडे भाड्याने! Address
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
खास लग्नासाठी भरजरी कपडे भाड्यानं मिळतात. त्यावर रत्नजडीत ज्वेलरीही काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी दिली जाते. त्यानुसार आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. ते जरा जास्त असतात. परंतु काही हजार रुपये खर्च करण्यापेक्षा काहीशे रुपयांमध्ये काम फत्ते होतं.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : लग्नात आपण सर्वात भारी दिसायला हवं, अशी जवळपास सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे हवी, नको ती सगळी हौस लग्नात पुरवली जाते. सर्वाधिक खर्च होतो तो कपड्यांवर. आता नवरीसाठीचे लेहेंगे अगदी 40-50 हजारांना मिळतात. एवढा खर्च करून हे कपडे एकदाच वापरले जातात, कपाटात दीर्घकाळ पडून राहिल्यानं ते खराब होऊ लागतात. शिवाय आजकाल लग्नांमध्ये करवल्यांचीही हीच स्थिती असते. यापेक्षा बेस्ट पर्याय आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपले हजारो रुपये वाचू शकतील आणि लग्नात आपण सर्वात भारीही दिसू शकाल.
advertisement
विविध ठिकाणी खास लग्नासाठी भरजरी कपडे भाड्यानं मिळतात. त्यावर रत्नजडीत ज्वेलरीही काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी दिली जाते. त्यानुसार आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. ते जरा जास्त असतात. परंतु काही हजार रुपये खर्च करण्यापेक्षा काहीशे रुपयांमध्ये काम फत्ते होतं. डोंबिवलीत एका ठिकाणी तर चक्क 500 रुपयांना लग्नाचे कपडे भाड्यानं मिळतात. स्त्री, पुरुष दोघांसाठीदेखील इथं कपडे उपलब्ध आहेत.
advertisement
डोंबिवली स्थानकापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर 'पॉपिन' हे क्लोथ्स रेंट शॉप आहे. इथं नवरीसाठी सुंदर घागरा, शालूपासून नवऱ्यासाठी शेरवानीपर्यंत सर्व प्रकारचे कपडे नवनवीन फॅशननुसार मिळतात. तसंच नवरदेवासाठी मोत्यांच्या माळाही इथं भाड्यानं मिळू शकतात. त्यांची किंमत फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. फेटे तर इथं ना ना प्रकारचे असतात.
विशेष म्हणजे केवळ लग्नाच्या दिवसासाठीच नाही, तर मेहंदी, हळद, संगीत, अशा विविध कार्यक्रमांसाठी इथं सुंदर कपडे भाड्यानं मिळतात. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, जर नवऱ्यासाठी ब्लेझर 3 दिवसांसाठी हवा असेल, तर त्यासाठी फक्त 500 रुपये द्यावे लागतात. तर, संपूर्ण कोट सेटची किंमत आहे 2000 रुपये. तर, नवरीसाठी घागऱ्यांची किंमत 2500 ते 8000 रुपयांपासून सुरू होते. नवरीसोबत करवल्यांसाठीदेखील इथं विविध प्रकारचे कपडे मिळतात. नऊवारी साडीची किंमत सुरू होते 800 रुपयांपासून.
advertisement
डोंबिवली रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टिळक कॉम्ल्पेक्सच्या पहिल्या मजल्यावरच पॉपिनचं दुकान आहे. लग्नात जास्त खर्च न करता महागडे कपडे घालायचे असतील आणि सुंदर लूक करायचा असेल तर या दुकानात आपण मनसोक्त शॉपिंग करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्न, पार्टीत 500 रुपयांत करा राजेशाही लूक, मुंबईजवळ मिळतात भरजरी कपडे भाड्याने! Address