Girls Safety Tips : सुरक्षित आणि आनंदी सोलो ट्रिप करायचीय, मुलींनी प्लॅन करताना या गोष्टी नक्की पाहाव्या
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Travel Safety Tips For Solo Female Travelers : तुम्हाला सोलो टीप प्लॅन करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी मदत करतील.
मुंबई : एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. अनोळखी ठिकाणी फिरण्यापूर्वी त्या ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक संस्कृती, सुरक्षित परिसर आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीची माहिती आधीच मिळवा. तुम्हाला सोलो टीप प्लॅन करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी मदत करतील.
फिरायला जाण्यासाठीचा ठिकाणाची संपूर्ण माहिती घ्या..
ट्रॅव्हल एक्सपर्ट रितिक सैनी सांगतात की, एकट्याने फिरण्यामध्ये खूप धोका असतो, पण योग्य विचारपूर्वक हा धोका कमी करता येतो. जर एखादी महिला सोलो ट्रिपचा विचार करत असेल, तर त्या ठिकाणाबद्दल आधीच संपूर्ण माहिती करून घ्या. तिथली स्थानिक संस्कृती कशी आहे, रात्रीचे वातावरण कसे असते आणि वाहतुकीची सोयीसुविधा कशा आहेत, याची माहिती घ्या. जर तुम्हाला कुठूनही कळले की, ते ठिकाण मुलींसाठी सुरक्षित नाही, तर तुमचा प्लॅन बदलून टाका.
advertisement
फक्त कुटुंबासोबत लोकेशन शेअर करा..
आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेकदा मुली कुठे फिरत आहेत, काय करत आहेत याची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. ज्या ठिकाणी असतात, तिथून लाईव्हही करतात. अशा परिस्थितीत, कोणीही सहज त्या ठिकाणी पोहोचू शकतो. अशी चूक कधीही करू नका. तुमचे लोकेशन फक्त कुटुंबासोबत शेअर करा. तुमच्या दिवसाच्या प्रत्येक प्लॅनिंगची माहिती त्यांच्यासोबत सांगा. नेहमी गुगल मॅप किंवा व्हॉट्सॲपवर लाईव्ह लोकेशन शेअरिंग सुरू ठेवा, जेणेकरून तुमच्या घरच्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळत राहील.
advertisement
अनोळखी लोकांपासून दूर रहा..
अनेकदा एकट्या मुलीला पाहून लोक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तिच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. फिरताना अनोळखी लोकांपासून दूर रहा. तुमची वैयक्तिक माहिती कधीही देऊ नका. जरी ती व्यक्ती टॅक्सी किंवा हॉटेलचा स्टाफ असो. काही लोक गाइड बनून स्वस्तात पर्सनल टूर देण्याचे आमिष दाखवतात, अशा लोकांपासून दूर रहा. एकट्या असाल तर गर्दीच्या ठिकाणीच जा. निर्जन ठिकाणी जाणे टाळा. रात्रीच्या वेळी रस्त्यावर एकट्याने फिरू नका.
advertisement
पोशाखाकडे लक्ष द्या, भाषाही शिका..
जर तुम्ही परदेशात किंवा भारतात अशा ठिकाणी जात असाल जिथे लोक दुसरी भाषा बोलतात, तर त्या भाषेतील काही वाक्ये शिका जेणेकरून स्थानिक लोक तुम्हाला समजून घेऊन मदत करू शकतील. यामुळे तुम्ही स्थानिक लोकांशी बोलू शकाल आणि त्यांची मदत घेऊ शकाल. तसेच, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसार कपडे घाला. यामुळे तुम्हाला लोकांकडून अनावश्यक लक्ष मिळणार नाही.
advertisement
सुरक्षिततेची साधने सोबत ठेवा..
सोलो ट्रिपवर असताना आपल्यासोबत सुरक्षिततेची साधने ठेवा. यामुळे केवळ आत्मविश्वासच वाढत नाही, तर वाईट वेळी ही साधने तुमचा आधार बनतात. स्वतःच्या संरक्षणासाठी पेपर स्प्रे नक्की ठेवा. हा छोटा असतो आणि पर्समध्ये सहज ठेवता येतो. पर्सनल अलार्म डिव्हाइसचा खूप मोठा आवाज होतो, ज्यामुळे दूरपर्यंत आवाज ऐकू येतो. हे तुम्ही तुमच्या बॅगला, चावीच्या रिंगला किंवा ब्रेसलेटसोबत अडकवू शकता.
advertisement
तुमच्या जवळ की-चेन चाकू, सेफ्टी पिन किंवा हेअर पिन नक्की ठेवा. यांचा वापर करून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. तसेच, तुमच्या मोबाईलमध्ये स्थानिक पोलिसांचा आणि टुरिस्ट हेल्पलाइनचा नंबर स्पीड डायलवर ठेवा. मोबाईलवर My Safetipin, BSafe, Himmat यांसारखे अनेक ॲप ॲक्टिव्ह ठेवा आणि लाईव्ह लोकेशन शेअर करा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Girls Safety Tips : सुरक्षित आणि आनंदी सोलो ट्रिप करायचीय, मुलींनी प्लॅन करताना या गोष्टी नक्की पाहाव्या