Bone Density : हाडांची घनता वाढवण्यासाठी कोणते उपाय करायचे ? आहार - व्यायामानं हाडांचं दुखणं बरं होतं का ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मुंबई : आपल्या शरीरात एकूण दोनशे सहा हाडं असतात. वयोपरत्वे किंवा इतर कारणांमुळे हाडांची घनता कमी होण्याची समस्या जाणवू शकते.
हाडांमधील कॅल्शियम आणि खनिजांचं प्रमाण यावर त्यांची ताकद अवलंबून असते. हाडांची घनता चांगली असेल तर हाडं मजबूत असतात. पण, कमी घनतेमुळे ऑस्टियोपेनिया किंवा ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांना कमकुवत करणाऱ्या समस्या उद्भवू शकतात.
हाडांची घनता राखण्यासाठी केवळ कॅल्शियमच नाही तर विविध पोषक घटकांचीही आवश्यकता असते. हाडांची घनता कमी होण्याची कारणं आणि ती वाढवण्यासाठी आहारातील कोणते घटक मदत करू शकतात पाहूया.
advertisement
हाडांची घनता कमी होण्याची ही कारणं असू शकतात: याआधी कुटुंबात कोणाला असा त्रास झाला असेल तर, किशोरवयात हाडांचा विकास कमी होणं, धूम्रपान, बऱ्याच काळापासून जास्त प्रमाणात मद्यपान करणं, कमी सक्रिय असाल तर किंवा बराच काळ बेडरेस्टवर आहात
advertisement
तसंच तुम्हाला - एंडोक्राईन डिसीज, पचनाच्या समस्या, संधिवात, काही प्रकारचे कर्करोग, एचआयव्ही, ईटिंग डिसऑर्डर यासारखे काही आजार असतील तर:
निरोगी हाडांना - कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन आणि सिलिकॉन सारखी खनिजं या पोषक घटकांची आवश्यकता असते.
आहारात हे पदार्थ समाविष्ट करा:
कमी चरबीयुक्त मासे आणि दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत.
advertisement
पालक, रताळं, मनुका आणि भेंडीत मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं असतं.
संत्री, केळी, मनुका आणि टोमॅटो उत्पादने पोटॅशियमचे समृद्ध स्रोत आहेत.
लाल आणि हिरव्या सिमला मिरच्या, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पपई आणि अननस यात व्हिटॅमिन सीचं प्रमाण लक्षणीय असतं.
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन के चे उत्कृष्ट स्रोत आहेत.
advertisement
हाडांची घनता कमी झाली असेल तर ती पूर्णपणे भरुन येईलच असं नाही. पण, हाडांचं आरोग्य राखण्यासाठी सातत्यपूर्ण आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतल्या बदलांद्वारे हाडांची घनता मोठ्या प्रमाणात भरुन निघणं शक्य आहे.
या प्रक्रियेला सहा-बारा महिने लागू शकतात. नवीन हाड तयार करण्यासाठी वजन उचलण्याचे व्यायाम उपयुक्त मानले जातात. हाडांची घनता कमी होत असेल तर हाडांमधे कॅल्शियम आणि इतर खनिजांचं प्रमाण निश्चित करण्यासाठी एक्स-रे चाचण्यांचा वापर केला जाऊ शकतो. याला DEXA स्कॅन किंवा हाडांची घनता चाचणी म्हणतात, हा कमी-किरणांचा एक्स-रे आहे. तो पाठीचा कणा, कंबर आणि हात यासारख्या भागांची तपासणी करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 11:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bone Density : हाडांची घनता वाढवण्यासाठी कोणते उपाय करायचे ? आहार - व्यायामानं हाडांचं दुखणं बरं होतं का ?






