Health Emergency : ताप-खोकला, थोडंसं दुर्लक्ष अन् थेट व्हेंटिलेटरवर पोहोचला 15 वर्षांचा मुलगा! 'ही' छोटी चूक ठरली कारण

Last Updated:

Health Negligence Effects : एक खरी घटना आपल्याला हे दाखवून देते की, लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने काय परिणाम होऊ शकतात. ही घटना दुर्लक्षित लक्षणांमुळे झालेल्या गंभीर स्थितीची आहे, जी आपल्याला सतर्क राहण्यास शिकवते.

तज्ज्ञांनी सांगितले काय चुकले आणि काय करायला हवे होते..
तज्ज्ञांनी सांगितले काय चुकले आणि काय करायला हवे होते..
मुंबई : आरोग्याच्या बाबतीत छोटीशी लक्षणेही गंभीर आजाराची पूर्वसूचना असू शकतात. क्षयरोग (टीबी) हा आजार अजूनही मोठ्या प्रमाणात आढळतात आणि दुर्लक्षामुळे ते जीवघेणे ठरू शकतात. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास साधा खोकला किंवा ताप गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतो. एक खरी घटना आपल्याला हे दाखवून देते की, लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने काय परिणाम होऊ शकतात. ही घटना क्षयरोगाच्या दुर्लक्षित लक्षणांमुळे झालेल्या गंभीर स्थितीची आहे, जी आपल्याला सतर्क राहण्यास शिकवते.
नुकतीच घडलेली घटना
डॉ. रवींद्र कुलकर्णी (MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts) यांनी एका एक्सबद्दल आपल्या एक्स अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 15 वर्षीय मुलगा इमर्जन्सी रूममध्ये दाखल झाला. गेल्या एका महिन्यापासून त्याला सतत ताप, खोकला आणि वजन कमी होत होते. गेल्या दोन दिवसांत श्वास लागणे सुरू झाले. घरच्यांना वाटले काही साधे असेल आणि होमिओपॅथिक उपचार सुरू होते. पण लक्षणे थांबली नाहीत, उलट वाढत गेली. (कोणत्याही Pathy उपचारांबद्दल त्यांना आक्षेप नाही असे त्यांनी लिहिले).
advertisement
रुग्णालयात आल्यावर मुलाची स्थिती होती गंभीर
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुलाची हृदयगती 180, ऑक्सिजन पातळी फक्त 60% तर त्याला तीव्र श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. रुग्णालयात आल्यावर अवघ्या एक तासात मुलाला व्हेंटिलेटर लागला. एक्स-रेमध्ये पल्मोनरी कोक्स (क्षयरोग) आणि त्याच्या गुंतागुंती दिसल्या. मुलावर उपचार सुरू आहेत, पण पुढचे काही तास निर्णायक आहेत, असे त्यांनी सांगितले.
advertisement
तज्ज्ञांनी सांगितले काय चुकले आणि काय करायला हवे होते..
- 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त ताप किंवा खोकला असल्यास वाट पाहू नये. ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.
- वजन कमी होणे, विशेषतः मुलांमध्ये हा गंभीर इशारा आहे.
- तरुण आहे असे गृहीत धरून उपचार टाळू नये. तारुण्य हे सुरक्षिततेचे प्रमाणपत्र नाही. क्षयरोग तरुणांनाही होऊ शकतो.
advertisement
- उपचारात सुधारणा नसेल तर त्वरित सेकंड ओपिनियन घ्यावे. उपचारणाची पद्धत बदलणे अपमान नाही, तो वेळेवर घेतलेला योग्य निर्णय आहे.
- वेळेवर निर्णय घेणे महत्त्वाचे. या मुलाच्या बाबतीत इमर्जन्सीपर्यंत पोहोचण्याआधी उपचार सुरू केले असते तर व्हेंटिलेटर टाळता आला असता.
advertisement
क्षयरोगा सारखे आजार वेळेवर ओळखले नाहीत तर अचानक जीवघेणे ठरू शकतात. कोणताही त्रास जास्त दिवस सहन करू नका. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक चाचण्या (एक्स-रे, ब्लड टेस्ट) करा आणि उपचारात सुधारणा नसेल तर दुसरा सल्ला घ्या. वेळेवर घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Emergency : ताप-खोकला, थोडंसं दुर्लक्ष अन् थेट व्हेंटिलेटरवर पोहोचला 15 वर्षांचा मुलगा! 'ही' छोटी चूक ठरली कारण
Next Article
advertisement
Santo Dhuri On CM Devendra Fadnavis:  रात्री CM फडणवीसांसोबत भेट,  १० तासानंतर संतोष धुरींनी मौन सोडलं,  ''मनसेत मी...''
रात्री फडणवीसांसोबत भेट, १० तासानंतर संतोष धुरींनी मौन सोडलं, ''मनसेत मी...''
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या भेटीनंतर धुरी

  • अखेर त्यांनी या भेटीमागचे सविस्तर कारण स्पष्ट करत सूचक वक्तव्य केले आहे.

  • मनसेचे नेते संतोष धुरी यांनी आज आपल्या भूमिकेबाबत मौन सोडले आहे.

View All
advertisement