advertisement

Health Tips : फास्ट रनिंगपेक्षा स्लो रनिंग करा, होतील हे जबरदस्त फायदे! ब्लड प्रेशरही राहील नियंत्रित..

Last Updated:

बरेच लोक जिममध्ये जाण्यापेक्षा घरीच व्यायाम करतात किंवा चालणे धावणे अशा क्रिया करतात. काही काही लोक फास्ट रनिंग म्हणजेच वेगवान धावतात. परंतु जर तुम्हाला वेगाने धावायचे नसेल तर तुम्ही स्लो रनिंगदेखील करू शकता.

News18
News18
मुंबई : व्यायाम ही हल्लीच्या कळतील सर्वात आवश्यक क्रिया बनली आहे. कारण बदलत्या, धावत्या जीवनशैलीमध्ये आपल्या इतर सवयी बिघडल्या आहेत. घाईघाईमध्ये चुकीचे अन्न खाणे, कंप्यूटरसमोर तासंतास बसून काम केल्यामुळे शरीराची हालचाल कमी होणे, शिवाय घरातल्या कामांसाठी आता इतकी उपकारां मिळतात की घरातली कामही आता कमी कष्टाची झाली आहेत. त्यामुळे अतिरिक्त व्यायाम करणं हल्ली खूप गरजेचं झालं आहे.
बरेच लोक जिममध्ये जाण्यापेक्षा घरीच व्यायाम करतात किंवा चालणे धावणे अशा क्रिया करतात. काही काही लोक फास्ट रनिंग म्हणजेच वेगवान धावतात. परंतु जर तुम्हाला वेगाने धावायचे नसेल तर तुम्ही स्लो रनिंगदेखील करू शकता. फिटनेसच्या जगात हळू चालणे कमी लेखले जात आहे. परंतु, हळूहळू धावणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी वेगाने धावणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कमी वेगाने धावल्याने तुमचे हृदय आणि मेंदू दोघांनाही चालना मिळते आणि लठ्ठपणा कमी होतो. चला पाहुयात याचे इतर फायदे काय आहेत.
advertisement
CNN च्या रिपोर्टनुसार, कमी वेगाने धावणे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने तुम्ही सहज कॅलरी बर्न करू शकता आणि यामुळे दुखापतीचा धोकाही कमी होतो. विशेष म्हणजे तुम्ही जास्त वेळ स्लो रनिंग करू शकता आणि जास्त अंतर कापू शकता. कमी वेगाने धावणे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
advertisement
नियमितपणे कमी वेगाने धावल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. निरोगी लोकांनी त्यांचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी कमी वेगाने धावणे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या रुग्णांनी अशा प्रकारे धावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ज्ञांच्या मते, कमी वेगाने धावण्याने उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ही पद्धत सर्वात फायदेशीर मानले जाते. हाय बीपीचे रुग्ण दररोज कमी गतीने धावत असतील तर बीपी नियंत्रित ठेवता येतो.
advertisement
ताण कमी करण्यासाठी हा नैसर्गिक मार्ग आहे. तणाव आणि चिंताग्रस्त लोकांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते. कमी वेगाने धावल्याने स्नायू आणि सांध्यांवर कमी ताण पडतो. त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. कमी वेगाने धावल्याने एकूणच आरोग्य सुधारू शकते. मात्र, ज्या लोकांना कोणताही गंभीर आजार आहे त्यांनी हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : फास्ट रनिंगपेक्षा स्लो रनिंग करा, होतील हे जबरदस्त फायदे! ब्लड प्रेशरही राहील नियंत्रित..
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement