advertisement

Home Remedy : अन्न नीट पचत नाही, आंबट ढेकर येतात? घरी बनवा हे देसी चूर्ण, रोज पोट होईल साफ

Last Updated:

बऱ्याच लोकांना गॅसेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आंबट ढेकर येणे या समस्या येतात. बरेच लोक यावर नियमित उपाय म्हणून काही औषधं घेतात. मात्र रोज आपण या समस्यांसाठी औषध घेणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना गॅसेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आंबट ढेकर येणे या समस्या येतात. बरेच लोक यावर नियमित उपाय म्हणून काही औषधं घेतात, मग ते रासायनिक असेल किंवा आयुर्वेदिक. मात्र रोज आपण या समस्यांसाठी औषध घेणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. आज आम्ही तुम्हाला एक जुना पण तितकाच प्रभावी उपाय सांगणार आहोत. खरं तर एक चूर्ण, जे तुमच्या पोटाच्या सर्व समस्या चुटकीसरशी सोडवेल.
पोटाच्या समस्या सोडवण्यासाठी घरी बनवा हे चूर्ण..
चूर्ण बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा ओवा, दोन चिमूटभर हिंग, एक चमचा जिरे, एक चमचा बडीशेप, एक चमचा चंदन घ्या. आता गॅसवर कढई गरम करून त्यात ओवा, जिरे आणि बडीशेप घालून थोडी भाजून घ्या. नंतर त्यात हिंग घालून थोडे भाजून घ्या आणि गॅस बंद करा. नंतर या सर्व गोष्टी चांगल्या थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर बनवा. शेवटी या मिश्रणात धणेपूड घाला. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी पाचक पावडर तयार होते.
advertisement
पाचक चुर्णाचे फायदे..
- ही घरगुती पाचक पावडर तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. हिंग हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल आहे, जे पचन सुधारते आणि गॅस आणि ब्लोटिंगपासून आराम देते. यासोबतच पचनशक्ती सुधारते आणि अन्न पचन होण्यास मदत होते.
advertisement
- जिऱ्यामध्ये गॅस्ट्रिक विरोधी गुणधर्म असतात आणि ते चयापचय सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यात मदत करतात. यासोबतच जिऱ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पोट साफ करण्यात चांगली भूमिका बजावते.
- जर आपण ओव्याबद्दल बोललो, तर त्यात सक्रिय एन्झाईम्स आणि थायमॉल असतात, जे गॅस्ट्रिक ज्यूसच्या स्रावमध्ये उपयुक्त ठरतात. यामुळे अन्न पचन चांगले होते.
advertisement
- तसेच बडीशेप गॅस-अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्याचे काम करते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहाते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Home Remedy : अन्न नीट पचत नाही, आंबट ढेकर येतात? घरी बनवा हे देसी चूर्ण, रोज पोट होईल साफ
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement