Health Tips : पोटातला गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कायमची संपेल, फक्त या 3 टिप्स करा फॉलो
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
बरेच लोक पोट फुगणे, गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे आपल्या दूरगामी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चला पाहूया आपल्याला गॅसेसचा त्रास का होतो आणि तो कसा रोखावा.
मुंबई : बऱ्याच लोकांना पोट फुगणे, गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन असे त्रास होतात. काही लोकांना दिवसभर या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. परंतु काही लोकांना हा त्रास केवळ सकाळी थोडावेळ होतो. म्हणून बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे आपल्या दूरगामी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चला पाहूया आपल्याला गॅसेसचा त्रास का होतो आणि तो कसा रोखावा.
आपल्या पोटात नेहमी 100 ते 150 मिली गॅसेस असतात, परंतु जेव्हा हे वायू खूप वाढतात तेव्हा त्रास होतो. पोटात गॅसची समस्या अनेकदा अस्वस्थ परिस्थिती निर्माण करते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये या वाढलेल्या वायूला माणूसच जबाबदार असतो. साधारणपणे खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवते.
आपल्या पोटात असंख्य जिवाणू असतात, जे आपल्याचा अन्नातून त्यांचे अन्न घेतात आणि ते पचवताना वायू देखील तयार करतात. जेव्हा हे जीवाणू कर्बोदके, फायबर, स्टार्च इत्यादी आंबवतात तेव्हा भरपूर वायू तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत खाण्याच्या सवयी सुधारूनच गॅस आणि पोटफुगीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
या 3 पद्धतींनी संपवा गॅसची समस्या..
1. सावकाश जेवण करा : बिझनेस इनसाइडरच्या बातमीत, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विल व्हल्सीविझ यांनी सांगितले की, आपण अन्न तोडण्यासाठी पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियावर पूर्णपणे अवलंबून आहोत. जेव्हा आपण बॅक्टेरियाच्या क्षमतेपेक्षा जास्त गोष्टींचे सेवन करतो तेव्हा गॅसची समस्या वाढते. अशा परिस्थितीत गॅसपासून मुक्ती मिळवायची असेल तर हळूहळू खाणे सुरू करा. याचा अर्थ प्रथम फायबरयुक्त अन्न कमी खा आणि हळूहळू ते वाढवा. डॉ. विल व्हल्सीविझ यांनी सांगितले की, गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी प्रथम अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे सेवन सोडून द्या आणि हळूहळू हिरव्या पालेभाज्यांचे म्हणजेच फायबरयुक्त आहाराचे सेवन वाढवा.
advertisement
2. हायड्रेटेड राहा : जर तुमच्या पोटात पुरेसे द्रव नसेल तर गॅस आणि पोट फुगण्याची समस्या वाढेल. त्यामुळे तुमच्या शरीरात कधीही पाण्याची कमतरता भासू नये. पोटात पुरेसे पाणी असल्याशिवाय अन्नाचे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे गॅस आणि फुगण्याची समस्या निर्माण होते. यासाठी पाण्यासोबत रसाळ फळांचे सेवन करावे. डॉक्टर विल व्हल्सीविझ म्हणतात की, सकाळी उठल्याबरोबर दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाण्याने करावी. यानंतर, प्रत्येक वेळी जेवणासोबत किमान दोन ग्लास पाणी प्यावे.
advertisement
3. जुनाट आजार : काही जुनाट आजार आहेत, ज्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. आतड्यांसंबंधी व्रण, डायव्हर्टिकुलिटिस, क्रॉन्स इत्यादी रोगांमुळे देखील गॅस होऊ शकतो. त्याच वेळी, तुमचे आतडे काही पदार्थ सहन करण्यास सक्षम नसतात. भारतातील बहुतेक लोकांना दूध असहिष्णुतेची समस्या आहे. अशी समस्या असल्यास त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2024 9:22 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पोटातला गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कायमची संपेल, फक्त या 3 टिप्स करा फॉलो