या महिलांवर होतेय मोफत प्लास्टिक सर्जरी, आंतरराष्ट्रीय संघटनेचा पुढाकार, Video

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात हिंसाचारात भाजलेल्या महिलांवर 10 दिवस मोफत उपचार केले जातात.

+
या

या महिलांवर होतेय मोफत प्लास्टिक सर्जरी, आंतरराष्ट्रीय संघटनेचा पुढाकार, Video

छत्रपती संभाजीनगर, 2 डिसेंबर : घरगुती हिंसाचारात जाणारा महिलांचा बळी ही देशातील गंभीर समस्या आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटूनही महिलांबाबतच्या घरगुती हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. यामध्ये मारणे, जाळणे असे प्रकार देखील घडतात. यातूनच महिलांना व्यंग निर्माण होते. आयुष्यभर त्यांना हे डाग घेऊन जगावे लागते. पण यासाठीच 'रिकन्स्ट्रक्टिंग वुमन इंटरनॅशनल' ही आंतरराष्ट्रीय संस्था काम करतेय. संस्थेच्या माध्यमातून अशा महिलांवर छत्रपती संभाजीनगर येथे मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येतेय.
आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुढाकार
'रिकन्स्ट्रक्टिंग वुमन इंटरनॅशनल' ही संस्था समाजातील हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी काम करते. घरगुती हिंचारामध्ये कुठेतरी भाजलेल्या किंवा जखमी झालेल्या महिलांवर मोफत प्लास्टिक सर्जरीचे उपचार केले जातात. रिकन्स्ट्रक्टिंग वुमन इंटरनॅशनल या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेत आहे. तर दुसरं कार्यालय जर्मनी येथे आहे. भारतातही ही संस्था 2013 पासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे ही संस्था भारतात फक्त महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील बेंबडे हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे.
advertisement
महिलांवर होतात मोफत उपचार
रिकन्स्ट्रक्टिंग वुमन इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परदेशी डॉक्टर भारतात येतात. छत्रपती संभाजीनगर येथील बेंबडे हॉस्पिटलमध्ये घरगुती हिंसाचार किंवा इतर घटनांमध्ये भाजलेल्या, अवयव निकामी झालेल्या महिलांवर प्लास्टिक सर्जरीचे उपचार केले जातात. त्यासाठी 10 दिवसांचा कॅम्प असतो. सध्या शहरात हंगेरी आणि फिनलंड येथील डॉक्टर हे आलेले आहेत. डॉ. औटी, डॉ. इमरेली कारलेला, डॉ. लेवी बर्नडेट, डॉ. हेली कावेली, डॉ. सिसको करीना मेटीला हे परदेशातून आले आहेत. शहरातली डॉक्टर रमाकांत बेंबडे, डॉ. श्रीगोपाल भट्टड, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. आविनाश तम्मेवर यांची टीम आहे.
advertisement
आतापर्यंत 240 सर्जरी मोफत
आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून 2013 पासून आतापर्यंत 240 सर्जरी करण्यात आल्या आहेत. विषेश म्हणजे या सर्व सर्जरी मोफत केल्या जातात. याचा सर्व खर्च हा रीकन्स्ट्रक्टिंग वुमन इंटरनॅशनल ही संस्था करते, असेही डॉ. बेंबडे सांगतात.
वर्षभर केली जाते महिलांची नोंद
ज्या महिलांना घरगुती हिंसाचारातून भाजलेले आहे किंवा व्यंगत्व आले आहे. अशा महिलांची वर्षभर आम्ही नोंद करून ठेवतो. त्यांच्यासाठी दहा दिवस कॅम्पचे आयोजन केले जाते. अशा महिलांना समाजात वावरण्यासाठी नवीन रूप देतो. याचा मला खूप जास्त अभिमान आहे, असे बर्न स्पेशालिस्ट डॉ. रमाकांत बेंबडे सांगतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
या महिलांवर होतेय मोफत प्लास्टिक सर्जरी, आंतरराष्ट्रीय संघटनेचा पुढाकार, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement