शेतकऱ्यांनो, ही संधी सोडू नका, अनुदानावर मिळतायेत गाई म्हशी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेतकऱ्यांना आता अनुदानावरती गाय म्हैस मिळणार आहे. तसेच शेळीपालन कुक्कुटपालनासाठीही अनुदान मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, 27 नोव्हेंबर: नेहमीच बेभरवशाच्या निसर्ग चक्रात अडकणाऱ्या शेतकऱ्यांना जोडधंद्याच्या माध्यमातून आधार मिळत असतो. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारच्या वतीने अशा जोडधंद्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखी एक योजना जाहीर केली आहे. यातून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अनुदान मिळणार आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केल्यास गाई म्हशींसाठी अनुदान मिळेल, असे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.
गाई म्हशींसाठी अनुदान
शेतकऱ्यांना अनुदानावरती आता गाय म्हैस मिळणार आहे. सरकारच्या या योजनेसाठी काही नियम आहेत. यात खुल्या प्रवर्गासाठी अनुदान 50 टक्के असणार आहे. तर अनुसूचित जातींसाठी हे अनुदान 75 टक्के असणार आहे. या योजनेतून गाय व म्हैस भेटणार आहे. तुम्ही यासाठी 'महा बी एम एस, पोर्टलवर जाऊन 8 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकता. त्यासोबतच एक ॲप आहे. 'ए एच महा बी एम एस' हे ॲप तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. यावर तुम्हाला या योजनेसाठीच्या सर्व तपशील उपलब्ध आहे, असे डॉ. माने यांनी सांगितले.
advertisement
कुक्कुटपालन, शेळीपालनासाठीही अनुदान
गाई म्हशींसोबतच शेतकऱ्यांना कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठीही अनुदान मिळते. ही योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. यातून 1 हजार कुक्कुटपालन शेड तयार करू शकता. तसेच शेळीसाठी सुद्धा अनुदान आहे. यात दहा शेळी अधिक एक बोकड अशी ही योजना आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, असे डॉ. माने सांगतात.
advertisement
ऍपमध्ये मिळेल माहिती
शेतकऱ्यांसाठीच्या या योजनांचे लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची सर्व माहिती तुम्हाला ऍपमध्ये मिळते. यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, अल्पभूधारक ओळखपत्र अशी मूलभूत कागदपत्रे लागतात. तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही 8 डिसेंबरच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकता.
advertisement
8 डिसेंबरच्या आधी अर्ज करा
आमच्या विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहे, "की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत. त्यामुळे नक्कीच त्यांना अनुदान भेटेल. गाय आणि म्हशी तसेच कुक्कूटपालन, शेळीपालन यासाठीही अनुदान भेटेल. सर्वांनी 8 डिसेंबरच्या आधी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 28, 2023 10:04 AM IST