मोबाईलचा अतिवापर फारच धोकादायक, आतातरी लक्षात घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
mobile use - मोबाईल वापरण्याचे अनेक असे दुष्परिणाम आपल्या शारीरिक आणि विशेष करून आपल्या मानसिक आरोग्यावर होतात. आपण बघतो की अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात. कोणी अगदी दहा तासांवरदेखील मोबाईलचा वापर करतो.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा होत्या. पण आता या गरजांमध्ये अजून एक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे मोबाईल. आता अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अगदी तासनतास सर्वजण मोबाईल बघत असतात. पण याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक असे दुष्परिणाम होतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तर नेमके काय दुष्परिणाम होतात, लोकल18 च्या टीमने मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांच्याशी संवाद साधला.
advertisement
यावेळी त्यांनी सांगितले की, मोबाईल वापरण्याचे अनेक असे दुष्परिणाम आपल्या शारीरिक आणि विशेष करून आपल्या मानसिक आरोग्यावर होतात. आपण बघतो की अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात. कोणी अगदी दहा तासांवरदेखील मोबाईलचा वापर करतो. पण जर तुम्ही अतिरिक्त प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर केला तर यामुळे तुमचे मानसिक संतुलन खराब होण्याची भीती असते. कारण की जर तुम्ही मोबाईलचा अती वापर केला तर आपण कुठलीही गोष्टीचा जास्त विचार करत असतो. त्याचबरोबर अति चंचलता ही येते. अनेकजण चिंताग्रस्त होतात आणि काही जण हे डिप्रेशनमध्ये देखील जातात.
advertisement
मोबाईलमधील जग आणि आपलं वास्तविक आयुष्य यामध्ये खूप असा फरक आहे. कारण जे मोबाईलमध्ये असते ते आपल्या खऱ्या आयुष्यात असेल असे नाही. जर तुम्ही जास्तच या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुम्ही डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकता आणि यातून तुम्ही टोकाचं पाऊल देखील उचलू शकता, असे त्यांनी सांगितले.
advertisement
त्यामुळे जर तुम्हाला आवश्यकता असेल त्याचवेळी तुम्ही मोबाईल वापरावा. तसेच वेळेवर झोप घेणे देखील गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक जण मोबाईल हा रात्री उशिरापर्यंत बघत असतात. त्यामुळे झोप होत नाही. तुमची झोप ही पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही मोबाईलमध्ये कुठली गोष्ट बघितली तर त्याचा अति विचार करू नये, असे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 26, 2024 5:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मोबाईलचा अतिवापर फारच धोकादायक, आतातरी लक्षात घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान, VIDEO