advertisement

नवी मुंबईत गँगवॉर, चार दिवसात दुसरी घटना, पाठलाग करून कोयत्याने वार, CCTV VIDEO व्हायरल

Last Updated:

नवी मुंबईतील दिघा परिसरात गेल्या चार दिवसांपासून टोळीयुद्धाने भीषण रूप धारण केलं आहे.

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी नवी मुंबई: नवी मुंबईतील दिघा परिसरात गेल्या चार दिवसांपासून टोळीयुद्धाने भीषण रूप धारण केलं आहे. दोन गटांमध्ये सतत होणाऱ्या सशस्त्र हाणामारीमुळे स्थानिक रहिवासी प्रचंड दहशतीखाली वावरत असून, या गंभीर परिस्थितीमुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

समाजसेवकावरील हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळली

या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वी पडली. अलीकडेच नवी मुंबईतील समाजसेवक दिलपाक बुद्धप्रकाश यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी दोन दिवस या भागात कडक बंदोबस्त तैनात केला होता.
advertisement

बंदोबस्त हटताच पुन्हा रक्तरंजित खेळ

धक्कादायक बाब अशी की, पोलिसांनी तैनात केलेला बंदोबस्त हटवताच पुन्हा एकदा दिघा परिसरात 'गँगवार' सुरू झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन गट आमनेसामने येत असून, भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. या गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप

advertisement
परिसरात उघडपणे शस्त्रास्त्रांचा वापर होत असताना आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलीस नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचेच या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवी मुंबईत गँगवॉर, चार दिवसात दुसरी घटना, पाठलाग करून कोयत्याने वार, CCTV VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement