advertisement

Free Treatment: डॉक्टर असावा तर असा, सैनिक, पोलीस आणि गरीबांसाठी देतोय मोफत उपचार, Video पाहुन कराल कौतुक

Last Updated:

डॉ. नवनाथ दहीहंडे यांनी आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस बांधव तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब रुग्णांसाठी जीवनभर मोफत उपचार देण्याचा संकल्प केला आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावात एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नवनाथ दहीहंडे यांनी आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस बांधव तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब रुग्णांसाठी जीवनभर मोफत उपचार देण्याचा संकल्प केला आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि जनतेच्या सुरक्षेसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या वीरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत करून आपले ऋण फेडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
डॉ. दहीहंडे यांच्या कार्याला त्यांच्या पत्नी डॉ. देवयानी दहीहंडे या स्त्रीरोग तज्ज्ञांचा मोठा हातभार लाभला आहे. महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, विशेषतः गर्भधारणेच्या काळात लागणारे नऊ महिन्यांचे उपचार, तपासण्या आणि खर्चिक औषधोपचार हे सर्व सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इतकेच नाही तर रुग्णांना आवश्यक त्या गोळ्या, औषधे यावर सूट मिळते. रक्त तपासणी, लघवी तपासणीसह विविध वैद्यकीय चाचण्या देखील कमी दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे दहीहंडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
देशासाठी काहीतरी देण्याची भावना मनात बाळगून डॉ. दहीहंडे यांनी गेल्या 15 ऑगस्टपासून या सेवेला सुरुवात केली. अल्पावधीतच 15 ते 20 रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून त्यांना उपचार आणि तपासण्या पूर्णपणे मोफत मिळाल्या आहेत. त्यामुळे या वैद्यकीय उपक्रमाला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
advertisement
गरीब रुग्णांच्या डोळ्यांत दिलासा, शहीद आणि सैनिक कुटुंबीयांच्या मनात आदर, आणि पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान या उपक्रमामुळे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींपासून स्थानिक ग्रामस्थांपर्यंत सर्वांनीच डॉ. दहीहंडे यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत देशसेवेतून समाजसेवेपर्यंतचा प्रवास करताना दहीहंडे दाम्पत्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Free Treatment: डॉक्टर असावा तर असा, सैनिक, पोलीस आणि गरीबांसाठी देतोय मोफत उपचार, Video पाहुन कराल कौतुक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement