Healthy Diet for Exam: परीक्षेच्या काळात आहारावरही द्या लक्ष, हे खाणं टाळाच!

Last Updated:

Healthy Diet for Exam: परीक्षेच्या काळात आरोग्य चांगलं असणं गरजेचं असतं. त्यासाठी आहार देखील चांगला असावा लागतो. आहारतज्ज्ञांनी हेल्दी डायट सांगितला आहे.

+
Healthy

Healthy Diet for Exam: परीक्षेच्या काळात आहारावरही द्या लक्ष, हे खाणं टाळाच!

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना अगोदरच टेन्शन असतं. त्यामुळे बऱ्याचदा खाण्या-पिण्याकडं दूर्लक्ष होतं. या काळामध्ये विद्यार्थ्यांचा आहार चांगला असणं खूप गरजेचं असतं.  आहार चांगला असेल तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळे अभ्यास देखील चांगला होतो. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
हे खाणं टाळाच!
परीक्षेच्या काळामध्ये पालकांनी मुलांच्या आहारावर लक्ष द्यावे. या काळात विद्यार्थ्यांनी जास्त मसालेदार किंवा जास्त जड अन्न खाणं टाळावं. जर तुम्ही मसालेदार किंवा जड अन्न खाल्लं तर तुम्हाला सुस्ती येते किंवा झोप येऊ शकते. त्यामुळं हे खाणं टाळलं पाहिजे. त्यापेक्षा हलका आहार घ्यावा. तो पचायला देखील सोपं असतं. त्यामुळे पोटाची तक्रारी होत नाहीत आणि अभ्यास देखील चांगला होतो.
advertisement
ड्रायफ्रुट खाताना..
आहारात दररोज पोळी भाजी खाणं गरजेचं आहे. तसेच सर्व पालेभाज्यांचा देखील समावेश करू शकता. त्यासोबतच दूध देखील घेऊ शकता. फळे आणि फळांचा ज्यूस देखील फायदेशीर ठरतो. या काळात आहारत ड्रायफ्रुचा समावेश आवर्जून करावा. मात्र, ड्रायफ्रुट खाताना ते भिजवून खाणं गरजेचं आहे. यामध्ये काजू, बदाम, आक्रोड, मनुका यांचा देखील समावेश करू शकता. आवळ्याचा ज्यूस जरी घेतला तरी सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात विटामिन आणि एनर्जी मिळते, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
हळदीचं दूध फायदेशीर
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर हळदीचे दूध घेतलं तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. एक ग्लास दूध घ्यायचं आणि त्यात चिमूटभर हळद आणि थोडीशी सुंठ पावडर टाकायची. जेणेकरून तुम्हाला एनर्जी येते आणि तुमचं अभ्यासात मन लागतं. परीक्षेच्या काळात अशा पद्धतीनं आहाराची काळजी घेतल्यास कोणताही ताण-तणाव आणि थकवा न जाणवता तुम्ही अभ्यास करू शकता. तसेच पेपर देखील सोडवू शकता, असंही आहारतज्ज्ञ देशमुख सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Healthy Diet for Exam: परीक्षेच्या काळात आहारावरही द्या लक्ष, हे खाणं टाळाच!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement