advertisement

Digestion : अन्न पचनासाठी या टिप्स नक्की फॉलो करा, पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त

Last Updated:

खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय केल्यानं पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय पोटाच्या समस्याही टाळता येतात. या सवयींचा तुमच्या दिनक्रमात समावेश करा आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवा.

News18
News18
मुंबई : अन्न व्यवस्थित पचलं नाही तर शरीराला त्रास जाणवतो. काहींना पित्ताचाही त्रास होतो. जेवणानंतर काही घरगुती उपाय वापरणं पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय केल्यानं अन्न पचायला मदत होईल.
अन्न खाल्ल्यानंतर पचन प्रक्रिया योग्य प्रकारे होणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. पचनसंस्था नीट काम करत नसेल तर गॅस, अपचन आणि जडपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
अनेकदा जीवनशैलीतल्या बदलांचा पोटावर आणि पचनावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे आपली पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करणं महत्त्वाचं आहे.
advertisement
1. थोडा वेळ चाला
जेवणानंतर हलकं चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. व्यायामासाठी चालतात तसं जेवल्यानंतर चालू नका. हळूहळू चाला. यामुळे पचन गतिमान होतं आणि गॅस किंवा जडपणा यासारख्या समस्या टाळता येतात. खाल्ल्यानंतर, 10-15 मिनिटं हळूहळू चाला. जेवल्यानंतर कधीही जड व्यायाम करू नका, कारण यामुळे पचन प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो.
advertisement
2. कोमट पाणी प्या
कोमट पाणी प्यायल्यानं पोट साफ राहतं आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पोटात गॅस होण्याची समस्याही कमी होते. जेवणानंतर तीस मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्या. ते हळूहळू आणि एकेक घोट प्या.
3. बडीशेप
बडीशेप हे नैसर्गिक पाचक आहे. ज्यामुळे अन्न लवकर पचतं. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खावी. किंवा एक चमचा बडीशेप चावून पाणी प्या.
advertisement
4. जास्त खाऊ नका
अन्नाचे प्रमाण संतुलित ठेवलं नाही तर पचनक्रिया मंद होऊ शकते. शरीर सहज पचवू शकेल तेवढंच अन्न खा, अतिरिक्त अन्न खाण्यानं पचनसंस्थेवर ताण येतो. अन्न हळूहळू चावून खा, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
6. त्रिफळा चूर्ण
advertisement
त्रिफळा चूर्ण आयुर्वेदात पचनासाठी अत्यंत गुणकारी मानली जातं. यामुळे पोट स्वच्छ राहतं आणि गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जेवणानंतर एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत प्यावं.
7. पोटावर झोपू नका
जेवणानंतर लगेच झोपल्यानं पचनसंस्थेवर ताण पडतो. त्याऐवजी आरामात बसा किंवा फिरायला जा. डाव्या  कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा, यामुळे पचनासाठी मदत होते. जेवल्यानंतर कधीही पोटावर झोपू नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion : अन्न पचनासाठी या टिप्स नक्की फॉलो करा, पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement