महिलांनो अनियमित मासिक पाळी अन् मूड स्विंग्स, आहारात समावेश करा डार्क चॉकलेट, होतील हे फायदे
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्स, थकवा, वजन वाढ, त्वचेचे त्रास यामागे हॉर्मोनल इम्बॅलेन्स कारणीभूत ठरत आहे. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात घेतल्यास महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते.
अमरावती : सध्या धावपळीच्या युगात महिलांमध्ये हॉर्मोनल इंबॅलन्सची समस्या वेगाने वाढताना दिसत आहे. अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्स, थकवा, वजन वाढ, त्वचेचे त्रास यामागे हॉर्मोनल इम्बॅलेन्स कारणीभूत ठरत आहे. अशावेळी आहारात कशाचा समावेश करावा? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात घेतल्यास महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
डार्क चॉकलेट आणि हॉर्मोन्स यांचा संबंध काय?
डार्क चॉकलेट ताणतणाव कमी करण्यास मदत करते. कोर्टिसोल नियंत्रणात ठेवते. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. मॅग्नेशियम तणाव कमी करण्यास मदत करते आणि स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोर्टिसोलची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच डार्क चॉकलेटचा PMS आणि मूड स्विंग्सवर सकारात्मक परिणाम होतो. मासिक पाळीपूर्वी होणारी चिडचिड, नैराश्य, क्रेव्हिंग या समस्या कमी करण्यास डार्क चॉकलेट मदत करू शकते.
advertisement
तसेच इस्ट्रोजेन संतुलनास मदत करते. डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा इस्ट्रोजेन हॉर्मोनच्या संतुलनावर होतो. PCOS किंवा वजन वाढीच्या समस्या असणाऱ्या महिलांमध्ये डार्क चॉकलेटमुळे इन्सुलिन सुधारण्यास मदत होते. मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन घटकांमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली झोप म्हणजे संतुलित हॉर्मोन्सचा पाया आहे.
advertisement
कोणत्या महिलांसाठी विशेष फायदेशीर?
मासिक पाळी अनियमित असणाऱ्या महिलांसाठी डार्क चॉकलेट फायद्याचे आहे. तसेच PMS आणि मूड स्विंग्सचा त्रास असणाऱ्या महिला, पहिल्या टप्प्यातील PCOS असलेल्या महिलांना देखील डार्क चॉकलेट फायद्याचे आहे. कामाचा ताण आणि मानसिक थकवा जाणवणाऱ्या महिलांना देखील डार्क चॉकलेटमुळे आराम मिळू शकतो.
किती आणि कसे खावे?
70 ते 85 टक्के कोको असलेले डार्क चॉकलेट खाण्यासाठी निवडावे. दररोज 20 ते 25 ग्रॅमपेक्षा जास्त डार्क चॉकलेट खाऊ नये. रिकाम्या पोटी न खाता, जेवणानंतर किंवा संध्याकाळी घ्यावे.
advertisement
कोणत्या महिलांनी काळजी घ्यावी?
view commentsमधुमेह असणाऱ्या, तीव्र मायग्रेनचा त्रास असणाऱ्या महिला, आम्लपित्तची समस्या असणाऱ्या महिलांनी डार्क चॉकलेट खाऊ नये. खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
महिलांनो अनियमित मासिक पाळी अन् मूड स्विंग्स, आहारात समावेश करा डार्क चॉकलेट, होतील हे फायदे






