Skin Care In Winter : हिवाळ्यात त्वचा राहील सतेज, दिवसाची सुरुवात करा अशी, महत्त्वाच्या 6 टिप्सचा Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनेकजण सकाळच्या वेळी एक विशिष्ठ प्रकारचे पेय घेतात. काहीजण तर दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण, असं न करता आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे हेल्दी पेय तुम्ही घेऊ शकता.
अमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला विचार पडतो की, आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची? ज्यामुळे आपली त्वचा चांगली राहील आणि आपला पाचक अग्नी देखील सुधारेल. अनेकजण सकाळच्या वेळी एक विशिष्ट प्रकारचे पेय घेतात. काहीजण तर दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण, असं न करता आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे हेल्दी पेय तुम्ही घेऊ शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अतिशय सतेज दिसेल. ते पेय नेमके कोणते? याबाबत माहिती जाणून घेऊ.
1. सर्वात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा गाईचं तूप टाकून ते पाणी तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे पचन सुधारते, त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. तसेच शरीरात नैसर्गिक ऊब वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
2. दुसऱ्या दिवशी तुळस रात्री पाण्यात भिजत घालायची आणि ते पाणी सकाळी प्यायचं. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात. पिंपल्स व त्वचेवरील संसर्ग कमी होतो. तसेच त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
3. तिसऱ्या दिवशी काकडी, पुदिना हे रात्री पाण्यात भिजत घालायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं. यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते. चेहरा फुललेला म्हणजेच फ्रेश लूक मिळते. पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तुळस, पुदिना, काकडी आणि बाकी साहित्य टाकून पाणी पिल्यास आपल्याला अल्कलाईन वॉटर मिळतं.
advertisement
4. तसेच जिरे रात्री पाण्यात भिजत घालून ते पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामुळे शरीरातील काही भागावर आलेली सूज कमी होते. तसेच आवळा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता. त्यात कडीपत्ता टाकल्यास आणखी फायदा होतो. यामुळे त्वचा आणि केस दोन्ही चांगले राहतात.
5. अशाप्रकारे तुम्ही सात दिवस वेगवेगळं पाणी घेऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. एकच पाणी दररोज न घेता आठवड्याचे सातही दिवस तुम्ही वेगवेगळे पेय घेऊन त्वचा निरोगी ठेवू शकता.
advertisement
6. सर्व पेय नैसर्गिक आहेत, पण कोणता पदार्थ शरीराला सूट होतो हे पाहूनच निवडा. पोटात जळजळ, ॲसिडिटी, किंवा ॲलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित घेतल्यास स्किन ग्लो, पचन, आणि केसांची ताकद यामध्ये जाणवणारा बदल दिसतो.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 21, 2025 8:23 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Skin Care In Winter : हिवाळ्यात त्वचा राहील सतेज, दिवसाची सुरुवात करा अशी, महत्त्वाच्या 6 टिप्सचा Video








