Health Tips : हिवाळ्यात तुमच्याही टाचांना पडतात भेगा? करा हा लगेच उपाय, राहतील हेल्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळ्यात संपूर्ण शरीराची त्वचा अतिशय कोरडी होते. त्यामुळे अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यातीलच एक म्हणजे तळपाय, पायांच्या टाचा अतिशय कोरड्या होऊन त्याला भेगा पडतात.
Hअमरावती : हिवाळ्यात संपूर्ण शरीराची त्वचा अतिशय कोरडी होते. त्यामुळे अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यातीलच एक म्हणजे तळपाय, पायांच्या टाचा अतिशय कोरड्या होऊन त्याला भेगा पडतात. अनेक महिलांना तर हा त्रास इतका भयानक असतो की, चालताना देखील त्रास होतो. यासाठी अनेक उपाय केले जातात, पण तरीही हा त्रास कमी होत नाही. हा त्रास कमी करण्यासाठी आणि पायाच्या टाचा हेल्दी राहण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
हिवाळ्यात पायाच्या टाचांची काळजी कशी घ्यावी? याबाबत माहिती देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पायाची निगा राखणे. पाय स्वच्छ ठेवणे. त्यानंतर जर पायाला भेगा पडत असतील तर त्यासाठी युरियायुक्त मॉइश्चरायझर येतात ते लावावे. रात्री झोपताना हे मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरले तर तुमचे पाय अगदी नरम राहतील. त्याचबरोबर फूट क्रीम असतात ज्यात युरिया आणि ग्लायकोलिक ऍसिड असतं.
advertisement
तसेच आयुर्वेदात यासाठी कोकम म्हणून उपाय सांगितला आहे. किराणा दुकानात कोकमचं बटर मिळतं. ते सुद्धा तुम्ही गरम करून पायाला लावू शकता. तसेच आणखी एक उपाय आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. ज्यात तिळाचे तेल तुम्ही पायाला लावून मसाज करा. त्यानंतर कास्याच्या वाटीने पायाला 10 मिनिटे मसाज करा, याला पाद्याभंग्य म्हणतात. ही प्रक्रिया आता अनेक क्लिनिकमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्याठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. यामुळे पाय अगदी नरम राहतील.
advertisement
यासोबतच नियमित कोमट पाण्याने पाय धुणे. दिवसातून एकदा कोमट पाण्यात पाय 5-10 मिनिटे टाकून ठेवणे, हे देखील करणे गरजेचे आहे. त्यामुळे पायाची त्वचा नरम होते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. दिवसभरात 6–7 ग्लास पाणी प्या. आहारात ओमेगा-3, सुका मेवा, अळशी आणि चिया सिड्स, हंगामी फळे घ्या, यामुळे देखील फायदा होऊ शकतो, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
December 04, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात तुमच्याही टाचांना पडतात भेगा? करा हा लगेच उपाय, राहतील हेल्दी

