Banana Puri Recipe : मार्गशिष महिन्यात देवीच्या नैवद्यासाठी खास, झटपट बनवा केळीची पुरी, रेसिपीचा Video

Last Updated:

दर गुरुवारी झटपट तयार होणारा नेमका कोणता पदार्थ बनवायचा? हा प्रश्न असतोच. अशावेळी तुम्ही केळीची पुरी बनवू शकता.

+
Recipe 

Recipe 

अमरावती : मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यात दर गुरुवारी सायंकाळी देवाला गोडाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. दर गुरुवारी झटपट तयार होणारा नेमका कोणता पदार्थ बनवायचा? हा प्रश्न असतोच. अशावेळी तुम्ही केळीची पुरी बनवू शकता. अगदी झटपट तयार होते. जाणून घ्या, रेसिपी.
केळीची पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, 1 छोटा चमचा तूप आणि तळण्यासाठी तेल आणि एक पिकलेली केळी हे साहित्य लागेल.
केळीची पुरी बनवण्याची कृती
केळीची पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी साखर आणि केळी एकत्र मिक्स करून घ्यायची आहे. साखरेला पाणी सुटेपर्यंत ते मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात रवा टाकून घ्या. लगेच गव्हाचे पीठ देखील टाकून घ्या. नंतर ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यात पाणी वापरायचे नाही. केळी आणि साखरेच्या पाण्यात हे मिश्रण भिजवून तयार होते. नंतर त्यात थोडं मीठ आणि तूप टाकून घ्यायचं आहे. नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
advertisement
यानंतर पीठ मळून झालं असेल. नंतर हे 10 मिनिटे सेट होऊ द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर पुरी तयार करून घेऊ शकता. एक मोठी पुरी लाटून त्यात वाटीच्या साहाय्याने तुम्ही पुरी बनवू शकता. पुरी तयार झाली की, तळून घ्यायची आहे. त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्यात पुरी टाकून घ्या. छान सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायच्या आहेत. चविष्ट अशी केळीची पुरी तयार झाली असेल. ही पुरी तुम्ही श्रीखंडसोबत देवीला नैवेद्यासाठी दाखवू शकता. कुरकुरीत पुरी आणि श्रीखंड अतिशय टेस्टी लागते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Banana Puri Recipe : मार्गशिष महिन्यात देवीच्या नैवद्यासाठी खास, झटपट बनवा केळीची पुरी, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement