Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा रखरखीत होतीये? हे 5 उपाय, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, ओठ फुटणे यांसारख्या समस्या वाढतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीत केलेले महत्त्वाचे बदल देखील आपल्याला त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात.
जालना : राज्यात पावसाने माघार घेताच कडाक्याची थंडी जाणवत आहे. हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, ओठ फुटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी जवळपास प्रत्येकजण मार्केटमधील वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीत केलेले महत्त्वाचे बदल देखील आपल्याला त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात. याबाबत माहिती जालना येथील सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी दिली आहे.
पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा
हिवाळ्यात शीत हवामान असल्याने फार कमी प्रमाणात तहान लागते. त्यामुळे आपण पाणी फार कमी प्रमाणात पितो. परंतु भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेला फायदा होतो.
अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा
हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण अतिशय गरम पाण्याने अंघोळ करतात. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल बाहेर पडते आणि त्वचा रूक्ष होते. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला फायदा होतो.
advertisement
चेहरा आणि त्वचेसाठी वेगवेगळे लोशन वापरा
अनेकजण त्वचेवर वापरण्यासाठी आणलेले लोशन चेहऱ्यावर किंवा ओठावर देखील लावतात. यामुळे त्वचा चिपचिप होते. पिंपल्स येऊ शकतात. म्हणून त्वचेसाठी आणि चेहऱ्यासाठी वेगवेगळे लोशन वापरावे.
लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा
संत्रा, मोसंबी, पपई यांसारख्या फळांचे सेवन आवर्जून करा. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचेला चांगला फायदा होतो.
advertisement
वारंवार चेहरा धुणे टाळा
view commentsचेहरा सातत्याने धुतल्याने देखील त्वचा रखरखीत होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळाच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. फार जास्त वेळा चेहरा धुणे टाळा, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 11, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा रखरखीत होतीये? हे 5 उपाय, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

