advertisement

Health Tips: पावसाळ्यात हे पदार्थ आहे विषासारखे, पोट काय त्वचा सुद्धा होऊ शकते खराब!

Last Updated:

पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी त्यात आरोग्याच्या दृष्टीने अधिक सजग राहणे गरजेचे आहे. योग्य आहार, स्वच्छता आणि वैद्यकीय सल्ला यांच्या मदतीने पचनाशी संबंधित त्रास टाळता येऊ शकतात.

+
News18

News18

बीड: पावसाळा सुरू झाल्यापासून हवामानात मोठे बदल झाले असून त्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. या दिवसांत सर्दी, ताप, त्वचारोग यांसोबतच अपचन, गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. अनेक नागरिक पावसात भजी, वडे, मिसळ, चहा यासारख्या जड आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करतात जे अपचनास कारणीभूत ठरतात. दमट हवामानामुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते आणि त्यामुळे अपचनाचे प्रमाण वाढते. डॉक्टर विशाल थेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील बदललेली जीवनशैली आणि अन्नपद्धती यामुळे पोटाचे विकार जास्त प्रमाणात दिसून येतात.
या दिवसांत उघड्यावरचे, अर्धवट शिजवलेले किंवा दूषित पाणी वापरून बनवलेले अन्न खाल्ल्याने अपचनासोबतच अन्नविषबाधा होण्याचाही धोका असतो. घरगुती अन्न खाणे, उकळून पाणी पिणे आणि स्वच्छता राखणे हे उपाय या त्रासांपासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरतात. भजी, वडे यासारखे तळलेले पदार्थ अपचनाला कारणीभूत ठरतात. या काळात अनेकांना अन्न पचण्यास त्रास होतो, पोट फुगते, गॅस होतो आणि अशक्तपणाची भावना निर्माण होते.
advertisement
डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात हलका आणि पचणारा आहार घेणे आवश्यक आहे. खिचडी, उकडलेली भाजी, मूग डाळ, सूप यांसारखा आहार पचनास मदत करतो. जेवल्यानंतर थोडेसे चालणे, गरम पाणी पिणे आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहणे हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. बऱ्याच वेळा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने समस्या वाढते, त्यामुळे तक्रारी सुरू होताच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
advertisement
शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गर्भवती महिला यांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांचे पचनसंस्थेचे कार्य तुलनेने कमकुवत असल्यामुळे त्यांना अपचन किंवा अन्नविषबाधा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी त्यात आरोग्याच्या दृष्टीने अधिक सजग राहणे गरजेचे आहे. योग्य आहार, स्वच्छता आणि वैद्यकीय सल्ला यांच्या मदतीने पचनाशी संबंधित त्रास टाळता येऊ शकतात. अपचनासारख्या सामान्य वाटणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता योग्य ती उपाययोजना करणे हा उत्तम आरोग्याचा मार्ग ठरतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पावसाळ्यात हे पदार्थ आहे विषासारखे, पोट काय त्वचा सुद्धा होऊ शकते खराब!
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement