Egg Price Increase: चिकन-मटण काही पचेना, अंडेही आता परवडेना, पावसाळ्यात कोण आणि का वाढवता दर?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Egg Price Increase: पावसाळा आणि हिवाळा या दिवसांत अंडी खाणे शरीरासाठी पोषक असते, गेल्या काही दिवसांपासून अंडी महाग झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा आणि हिवाळा या दिवसांत अंडी खाणे शरीरासाठी पोषक असते, गेल्या काही दिवसांपासून अंडी महाग झाली आहे, तरीही खाणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. 160 ते 180 रुपयांना अंड्यांचा ट्रे मिळतो. 1 शेकडा अंडी 540 रुपयांना मिळते. प्रत्येकी 6 ते 7 रुपयांना एक अंडे मिळते. पोल्ट्री फार्म चालकांना जो फीड द्यावा लागतो त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने अंड्याची आवक काही प्रमाणात कमी झाली, असल्याचे होलसेल अंडी विक्रेते मुसद्दिप तांबोळी यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
पावसाळ्यात अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज 10 ते 12 लाख नागरिक अंडी खातात. पोल्ट्री फार्म चालकांना जो फीड कोंबड्यांना द्यावा लागतो त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. पालन पोषणाचा खर्च वाढला, त्याचाच थेट परिणाम अंड्यांच्या किंमतीवर झाला आहे.
advertisement
गावरान अंडी प्रत्येकाला परवडेल अशी नाही कारण एक अंडे 10 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत विकले जाते तर बॉयलर अंडे 6 ते 7 रुपयांना मिळते, त्यामुळे, गरीब कष्टकरी वर्ग गावरान अंडी नेहमी खाऊ शकत नाही म्हणून बॉयलर अंड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती अंडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आली.
advertisement
ऑम्लेट दुकानांवरही मागणी वाढली
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे अंड्यांची विक्री देखील वाढली असून अंड्यांच्या दरांमध्ये चढ-उतार कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाहेर गावाहून शाळा, कॉलेजसाठी विद्यार्थी येत असतात, तसेच नोकरदार प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याकडून अंडा ऑम्लेट आणि भुर्जीची मागणी मोठ्या प्रमाणात असते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 15, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Egg Price Increase: चिकन-मटण काही पचेना, अंडेही आता परवडेना, पावसाळ्यात कोण आणि का वाढवता दर?