चंद्रपुरच्या चाव्या कुणाकडे? महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर, कोण बनणार कारभारी? नावं समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ही जागा महिला ओबीसीसाठी राखीव सोडण्यात आली आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ही जागा महिला ओबीसीसाठी राखीव सोडण्यात आली आहे. चंद्रपुरात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी इथं कोणत्याच पक्षाकडं बहुमत नाही. त्यामुळे इथं कुणाची सत्ता येणार याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गट तिन्ही पक्षाकडून इथं महापौर पदावर दावा केला जात आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. आमच्या पक्षाला जो महापौर पद देईल, त्याच्यासोबत आम्ही युती करू, अशी भूमिका ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. हा गट ज्याला समर्थन देईल त्याची महापालिकेवर सत्ता येईल. जर इथं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर कोण होईल? आणि भाजपची सत्ता आली तर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, याची संभाव्य यादी आता समोर आली आहे.
advertisement
काँग्रेसकडून संभाव्य महापौर
(1) वैशाली महाडोळे
(2) चंदा वैरागडे
(3) संगीता भोयर
(4) संजीवनी वासेकर
(5) संगीता अमृतकर
भाजपकडून संभाव्य महापौर
(1) आशा देशमुख
(2) अनुजा तायडे
(3) संगीता खांडेकर
(4) सारिका संदूरकर
६६ सदस्यसंख्या असणाऱ्या चंद्रपुरात बहुमतासाठी ३४ जागांची आवश्यकता आहे. मात्र कोणत्याही एका पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. इथं काँग्रेस २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपने २३ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर शेकापने ३, शिवसेना (UBT) ६, बहुजन आघाडी (VBA) २, आणि इतर पक्षांनी ५ जागा जिंकल्या आहेत.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चंद्रपुरच्या चाव्या कुणाकडे? महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर, कोण बनणार कारभारी? नावं समोर









