White Hair : पांढरे केस अवघ्या 15 दिवसात होतील काळे, हे 5 घरगुती उपाय नक्की करुन पाहा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सध्या केस लवकर किंवा लहान वयातच पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यासाठी अनेक हेअर कलर उपलब्ध आहेत. पण काही सोपे, स्वस्त आणि घरगुती उपायही आहेत. यामुळे पांढरे केस 15 दिवसात काळे होतील.
मुंबई : सध्या केस लवकर किंवा लहान वयातच पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यासाठी अनेक हेअर कलर उपलब्ध आहेत. पण काही सोपे, स्वस्त आणि घरगुती उपायही आहेत. यामुळे पांढरे केस 15 दिवसात काळे होतील.
काळे, दाट आणि लांब केस प्रत्येकालाच हवे असतात, पण अपुरा आणि असंतुलित आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे तणाव, पोषणाचा अभाव, संप्रेरकांचं असंतुलन किंवा अनुवांशिक कारणांमुळेही केसांचा रंग जातो. आपल्या सभोवतालच्या अनेकांना ही समस्या भेडसावते आहे. मात्र, काही घरगुती उपाय रामबाण उपाय ठरतात.
त्यांच्या मदतीनं केस पुन्हा नैसर्गिक पद्धतीनं काळे करता येतात.
advertisement
खोबरेल तेल आणि लिंबू
खोबरेल तेल आणि लिंबू दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे केस मजबूत आणि चमकदार बनवतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. खोबरेल तेल आणि लिंबू एकत्र करा आणि केसांना लावा. 30 मिनिटांनंतर, शॅम्पूनं धुवा.
advertisement
चहा पावडर
अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये चहाचा वापर केला जातो. त्यामुळे पांढरे केसही काळे होतात. यासाठी एका ग्लास पाण्यात चहा उकळल्यानंतर तो गाळून थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर केसांना आणि टाळूला नीट लावा. साधारण एक तासानंतर केस धुवा. केस काळे करण्यासाठी या पर्यायाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
कांद्याचा रस
पांढरे केस काळे होण्यासाठी कांद्याचा रस हा देखील रामबाण उपाय आहे. कांद्याचा रस केसांच्या मुळांना नीट लावा. साधारण अर्धा तास ठेवल्यानंतर, केस चांगले धुवा. यामुळे केस सुंदर आणि मजबूत होतात.
advertisement
कढीपत्ता
कढीपत्ता अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याच्या मदतीने केस अगदी सहज काळे करता येतात. यासाठी खोबरेल तेलात कढीपत्ता काळा होईपर्यंत उकळा. यानंतर, ते मिश्रण गाळा आणि या मिश्रणानं नियमितपणे टाळूचं मालिश करा. यामुळे केस लवकर काळे होऊ शकतात.
advertisement
काही महत्वाच्या टिप्स
संतुलित आहार : तुमच्या आहारात प्रथिनं, लोह आणि व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
तणाव कमी करा : नियमित योग आणि ध्यान करा.
नैसर्गिक उत्पादनं वापरा: केसांसाठीची रासायनिक उत्पादनं वापरणं टाळा.
भरपूर पाणी प्या : शरीर हायड्रेट ठेवा. हे तब्येत चांगली ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 27, 2024 3:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
White Hair : पांढरे केस अवघ्या 15 दिवसात होतील काळे, हे 5 घरगुती उपाय नक्की करुन पाहा







