Veg Milk: दूध व्हेज की नॉनव्हेज, ओळखायचं कसं? भारत आणि अमेरिकेतील नवा वाद काय?

Last Updated:

Veg or Non Veg Milk: आपल्याकडे दूध हे शाकाहारी मानले जाते. तसेच गाईच्या दुधाला धार्मिक महत्त्व आहे. परंतु, आता दूध शाकाहारी की मांसाहारी असा नवा वाद निर्माण झाला आहे.

+
Veg

Veg Milk: दूध व्हेज की नॉनव्हेज, ओळखायचं कसं? भारत अन् अमेरिकेतील नवा वाद नेमका काय?

छत्रपती संभाजीनगर : दूध हा आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण अलीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली असून ती दूध शाकाहारी की मांसाहारी अशी आहे. दूध व्हेज आहे की नॉनव्हेज? या प्रश्नाने अनेकांना संभ्रमात टाकलं आहे. याबाबतचं नेमकं सत्य काय आहे हे लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊया.
भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार वाढवून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, डेअरी प्रॉडक्ट्सच्या आयातीवरून वाद निर्माण झाला आहे, जो थेट धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांशी जोडलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘नॉन-वेज दूध’. परंपरेनुसार, दूध हे शाकाहारी (व्हेज) मानलं जातं. कारण ते प्राण्यांची हत्या न करता मिळवले जाते.
advertisement
हिंदू धर्मात दूध हे पवित्र मानले जाते आणि ते देवाला नैवेद्य म्हणूनही अर्पण केलं जातं. त्यामुळे बहुसंख्य शाकाहारी लोक दूध, दही, तूप, पनीर या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात. भारतामध्ये  हिंदू आणि जैन धर्मीय लोक गायीला अत्यंत पवित्र मानतात. ते फक्त गायीचं दूधच पवित्र मानतात, पण ती गायही पूर्ण शाकाहारी चारा खाणारी असली पाहिजे, ही त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा गायीकडून मिळणारं दूध पवित्र मानल जातं.
advertisement
अमेरिकेतील डेअरी उद्योगात मोठ्या प्रमाणावर प्रोटीनयुक्त चारा दिला जातो. हे चारे स्वस्त व पोषक असतात, त्यामुळे त्यात प्राणीजन्य घटक मिसळले जातात. अमेरिकन कंपन्यांचं म्हणणं आहे की, दूध तर गायीच्या शरीरातून मिळतं, चाऱ्यापासून नाही, त्यामुळे तो नेहमीच शाकाहारी मानावा. त्यांनी भारत सरकारकडून सुचवलेल्या ‘नॉन-वेज’ लेबलिंग (लाल चिन्ह) वरही आक्षेप घेतला आहे.
advertisement
काय आहे नॉन-व्हेज दूध?
‘नॉन-व्हेज दूध’ हा कोणताही अधिकृत वैज्ञानिक शब्द नाही. पण भारत सरकारने अशा प्रकारच्या दूधाला धार्मिकदृष्ट्या शुद्ध न मानता, यावर बंदी घालण्याचा विचार केला आहे. कारण अमेरिकेतील अनेक डेअरी फॉर्म्समध्ये गायींना मांस, हाडांचे चूर्ण, माश्यांचे पावडर, कोंबड्यांचे अवशेष आणि प्राण्यांची चरबी मिसळलेला चारा दिला जातो. त्यामुळे, अशा गायीकडून मिळणारे दूधही ‘शाकाहारी’ राहात नाही, असं भारतातील काही धार्मिक समुदायांचं मत आहे.
advertisement
भारतातील गायांच्या आहारात काय असतं?
भारतामध्ये बहुतांश ठिकाणी गायींना सुका-ओला चारा, गहू-मका, खळी, कडधान्यांचे दाणे वगैरे दिले जातात. मोठ्या डेअरी फार्ममध्ये काही ठिकाणी पाश्चिमात्य पद्धतींचा प्रभाव दिसतो. मात्र अजूनही आपल्याकडे दुभत्या जनावरांना मांसाहारी चारा देत नाहीत.
शुद्ध शाकाहारी दूध ओळखायचं कसं?
  1. पॅकिंगवर ‘100% वेजिटेरियन फीड’, ‘गौशाळा आधारित दूध’ अशा टॅग्स पाहा.
  2. गौशाळांमधून थेट दूध घेणं अधिक विश्वासार्ह असतं.
  3. A2 गायींचं दूध (जसं गिर किंवा साहीवाल जातीचं) घेणं उत्तम
  4. ऑरगॅनिक प्रमाणपत्र असलेलं दूध निवडा.
  5. FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण) ने एक प्रस्ताव मांडला होता की, जर दूध किंवा डेअरी प्रॉडक्ट्स प्राणीजन्य चारा खाणाऱ्या गायींकडून आले असेल, तर त्या उत्पादनावर लाल ‘नॉन-व्हेज’ चिन्ह लावणं बंधनकारक करावं. यामुळे ग्राहकांना माहिती मिळेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Veg Milk: दूध व्हेज की नॉनव्हेज, ओळखायचं कसं? भारत आणि अमेरिकेतील नवा वाद काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement