Water Fasting: पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? वॉटर फास्टिंग डायटचा खरच फायदा होतो का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्या अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात. त्यातलाच एक डाएट म्हणजे वॉटर फास्टिंग.
छत्रपती संभाजीनगर : सध्या अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात. त्यातलाच एक डाएट म्हणजे वॉटर फास्टिंग. आणि हे डाएट सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला आहे. पण वॉटर फास्टिंग डाएटचे आपल्याला काय फायदे होतात? बाहेरील डाएट आपण करावे की करू नये? याविषयी आपल्याला माहिती आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलेली आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वॉटर फास्टिंग हे काही नवीन नाही आहे आपण अनेक वेळा ऐकलं असेल की सर्वजण निर्जला उपवास करतात किंवा करवा चौथ असेल किंवा हरतालिका असेल या दिवशी देखील अनेक लोक वॉटर फास्टिंग करतात म्हणजेच की फक्त पाणी पिऊन तो उपवास करतात. तर यालाच आताच्या काळामध्ये वॉटर फास्टिंग डाएट असं म्हटलं जातं. वॉटर फास्टिंग हे डाएट जे आहे ते म्हणजेच की एखादा व्यक्ती संपूर्ण दिवसभर फक्त पाणी पिऊनच तो दिवस काढतो यालाच वॉटर फास्टिंग असं म्हटलं जातं.
advertisement
वॉटर फास्टिंग करायचे फायदे कोणते?
वॉटर फास्टिंग करण्याचे फायदे म्हणजेच की ऑटोफेजीमध्ये मदत करते. ऑटोफेजी ही जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की जेव्हा आपण जेवण करत नाही तेव्हा जे एक्स्ट्रा डॅमेज झालेल्या सेल्स असतात किंवा प्रोटीन असतात शरीरातून बाहेर काढतो किंवा त्याला रिपेअर करतो याचं असं महत्त्व आहे. यामुळे आपलं वजन कमी करण्यामध्ये मदत होते. यामुळे भरपूर प्रमाणात कॅलरीज आपल्या त्या दिवसांमध्ये कमी होतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन असतं त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते. आणि आपली जी डायबिटीस असते ते कंट्रोल करण्यामध्ये देखील हे मदत करतो, आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलं.
advertisement
वॉटर फास्टिंग करताना आपल्याला काही गोष्टी या लक्षात ठेवाव्या लागतात. तसं की ज्यांचं वय खूप झालं आहे. किंवा असे काही आजार आहेत ज्यामध्ये त्यांना पाण्याची गरज आहे. तर अशा व्यक्तींनी हे वॉटर फास्टिंग करू नये. तसंच जास्त स्तनदा माता आहेत त्यांनी देखील वॉटर फास्टिंग करू नये. किंवा जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावं.
advertisement
वॉटर फास्टिंग केल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात यायला मदत होते पण आपण आपल्या शरीरानुसार हे वॉटर फास्टिंग करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तज्ज्ञांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वॉटर फास्टिंग करावं नाहीतर याचे उलट परिणाम देखील आपल्यावरती होऊ शकतात, असंही आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 09, 2025 8:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Water Fasting: पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? वॉटर फास्टिंग डायटचा खरच फायदा होतो का?