Diet for Brain: सततच्या तणावामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम? हे घरगुती उपाय करून ठेवा चिरतरुण, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Last Updated:

Diet for Brain: सततचा तणाव, अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मात्र, काही घरगुती नैसर्गिक उपायांमुळे आपण मेंदू तंदुरुस्त ठेवू शकतो.

+
Diet

Diet for Brain: घरगुती उपाय करून मेंदूला ठेवा चिरतरुण; काय म्हणतात तज्ज्ञ

बीड: मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्या कार्यातील किंचितसा बिघाड देखील त्रासदायक ठरतो. मेंदूचे कार्य सुरळीत सुरू नसेल तर आपल्या एकूण मानसिक क्षमतेवर आणि आरोग्याव परिणाम होतो. सततचा तणाव, अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मात्र, काही घरगुती नैसर्गिक उपायांमुळे आपण मेंदू तंदुरुस्त ठेवू शकतो. याबाबत लोकल 18ने बीड जिल्ह्यातील डॉक्टर झांजुर्णे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
ड्रायफ्रुट्स
मेंदूचे आरोग्य चांगले राहावे यासाठी, आपल्या दैनंदिन आहारामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश केला पाहिजे. रात्री भिजवलेले चार ते पाच बदाम दररोज सकाळी खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते. अक्रोडामध्ये मेंदूसाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदी टाकून कोमट दूध प्यायल्यास मेंदूची सूज कमी होते. हळदीमधील 'करक्यूमिन' हा घटक मेंदूच्या पेशींना सशक्त बनवतो.
advertisement
लसूण आणि फळे
मेंदूच्या आरोग्यासाठी लसूण देखील उपयुक्त आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या कच्च्या एक ते दोन पाकळ्या खाल्ल्यास शरीरात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण वाढते. हा घटक आपल्या मेंदूला चिरतरुण ठेवण्यास मदत करतो. याशिवाय डाळिंब, जांभूळ, मोसंबी यांसारख्या फळांचे रस अँटीऑक्सिडंट्सयुक्त असतात. त्यातून मेंदूला ऊर्जा आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो.
advertisement
डार्क चॉकलेट आणि पालेभाज्या
डार्क चॉकलेटचा छोटा तुकडा खाल्ल्यास लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यामध्ये फ्लाव्होनॉयड्स आणि नैसर्गिक कॅफिन असते, त्यामुळे मानसिक थकवा कमी होतो. याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये (पालक, मेथी, ब्रोकली) भरपूर प्रमाणात फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतात.
प्राणायम
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा गरजेची आहे. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. याशिवाय शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हे सर्व उपाय घरच्या घरी सहज करता येतात. विशेष म्हणजे त्यांचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet for Brain: सततच्या तणावामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम? हे घरगुती उपाय करून ठेवा चिरतरुण, तज्ज्ञांनी दिला सल्ला
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement