Emotional video: अन् त्याने भररस्त्यात आईचे पाय धरले, डोळ्यात घळाघळा अश्रू आणि कडकडून मिठी

Last Updated:

गोपाळ सावंतची CRPF निवड, कुडाळच्या पिंगुळी शेटकरवाडीतील कष्टकरी आईच्या संघर्षाला प्रतिष्ठा मिळाली. संपूर्ण गावात आनंद आणि प्रेरणा पसरली.

News18
News18
तो आला आणि समोर उभा न राहाताच थेट नतमस्तक झाला. त्याने आईचे पाय धरले. आजूबाजूचे लोक काय म्हणतील याचा विचार न करता. आईला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. अखेर त्याच्या प्रयत्नांचं आणि आईच्या कष्टाचं चीज झालं होतं. या मायलेकाला पाहून आजूबाजूच्या सगळ्यांचेच डोळे पाणावले. मित्रही रडले. उत्साहाने त्यांनी आई आणि मुलाच्या अंगावर गुलाल उधळला.
कुडाळ नगरपंचायतीच्या फुटपाथवर बसून उन्हातान्हात हार-फुलं विकणाऱ्या एका कष्टकरी आईच्या आयुष्याचं सोनं झालं. कुडाळच्या पिंगुळी शेटकरवाडीतील गोपाळ सावंत या तरुणाची CRPF मध्ये देशसेवेसाठी निवड झाली आहे. आपल्या निवडीची ही आनंदाची बातमी गोपाळने जेव्हा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या आईला जाऊन दिली, तेव्हा त्या माय-लेकाच्या भेटीचा व्हिडीओ पाहून अख्खा सिंधुदुर्ग भावुक झाला आहे.
advertisement
आईच्या संघर्षाला मुलाची सलामी
गोपाळची आई गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळमध्ये रस्त्याच्या कडेला बसून हार-फुलं विकण्याचे काम करते. अत्यंत गरिबीत आणि कष्टाच्या परिस्थितीत तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं आणि शिकवलं. आपल्या आईने आपल्यासाठी केलेले कष्ट गोपाळने जवळून पाहिले होते. म्हणूनच, 'काहीही करून आईचे पांग फेडायचे आणि देशाची सेवा करायची' हे स्वप्न उराशी बाळगून त्याने सैन्य भरतीसाठी मेहनत घेतली होती.
advertisement
तो क्षण आणि माऊलीची माया...
आज जेव्हा गोपाळ सीआरपीएफची वर्दी घालून, डॅशिंग रुबाबात थेट आईच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा क्षणभर आईलाही विश्वास बसला नाही. आपल्या काळजाचा तुकडा आज देशाचा रक्षक झाला आहे, हे पाहताच त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गोपाळने आईच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. भररस्त्यात घडलेला हा माय-लेकाचा सोहळा पाहून आजूबाजूचे व्यापारी आणि पादचारीही थांबले आणि त्यांनी गोपाळचे कौतुक केले.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Amrut Bankar (@mpsc_studentt)



advertisement
पिंगुळी गावाचा अभिमान
गोपाळ सावंत याच्या या यशाने केवळ शेटकरवाडीतच नव्हे, तर संपूर्ण पिंगुळी गावात आनंदाचे वातावरण आहे. "आईने रस्त्यावर बसून कष्ट केले, पण मुलाने आज त्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गोपाळची ही जिद्द आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Emotional video: अन् त्याने भररस्त्यात आईचे पाय धरले, डोळ्यात घळाघळा अश्रू आणि कडकडून मिठी
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement