advertisement

Health Tips : हिवाळ्यात त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो, सकाळच्या वेळी प्या बिट ज्यूस, आणखी हे फायदे पाहा

Last Updated:

सकाळच्या वेळी बिटरुट ज्यूस पिणे स्किनसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे त्वचेवर थेट सकारात्मक परिणाम होतो. 

+
Health

Health Tips 

अमरावती : आपल्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी, जेणेकरून आपली स्किन चांगली राहील, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर सकाळच्या वेळी बीटरूट ज्यूस पिणे स्किनसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण बीटरूटमध्ये भरपूर व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, लोह, फॉलिक ऍसिड असते, ज्यामुळे त्वचेवर थेट सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्वचेला नॅचरल ग्लो येण्यास मदत होते. तसेच आणखी बरेच फायदे होतात, त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
1. सकाळच्या वेळी बीटरूट ज्यूस पिल्यास त्वचा उजळते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. बीटरूट ज्यूसमधील व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा उजळ करण्यात मदत करतात.
2. बीटरूट ज्यूस रक्तातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. रक्त स्वच्छ झालं की पिंपल्स, एक्ने, ब्लॅकहेड्स कमी होतात. त्यामुळे रक्तशुद्धीसाठी देखील बीट ज्यूस मदत करते.
advertisement
3. बीटमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. सकाळी पिल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि स्किन मऊ दिसण्यास देखील मदत होते. अँटिऑक्सिडंट्समुळे वृध्दत्वाची चिन्हे कमी जाणवतात. स्किन टाइट होऊन यंग दिसू लागते.
4. बीटमधील बेटालेन पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. चेहऱ्यावरील लालसरपणा, ऍलर्जीमुळे होणारी चिडचिड कमी करतात. बीटरूट ज्यूसमध्ये भरपूर लोह असते. लोह नीट मिळाले की, स्किनला पिंक ग्लो येतो, निस्तेजपणा कमी होतो.
advertisement
बीट ज्यूस कधी आणि कसा घ्यावा?
सकाळी रिकाम्या पोटी बीट ज्यूस पिणे सर्वात उपयुक्त ठरू शकते. ½ किंवा 1 मध्यम बीट, त्यात थोडं लिंबू घालून प्यायल्यास फायदे दुप्पट होतात. BP चा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ज्यूस घ्यावा. तसेच कोणतीही ॲलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो, सकाळच्या वेळी प्या बिट ज्यूस, आणखी हे फायदे पाहा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement