Matcha Tea Benefits: शरीरात राहणार नाहीत विषारी घटक, कधी पिलाय का माचा टी? Video

Last Updated:

Matcha Tea Benefits: माचा हे जपानी हिरव्या चहाचे एक अत्यंत शुद्ध रूप आहे. हा चहा पारंपरिक हिरव्या चहा प्रमाणे पाण्यात उकळून तयार केला जात नाही.

+
माचा

माचा टी काय आहे काय होतात फायदे

छत्रपती संभाजीनगर : सध्या तुम्ही सोशल मीडियावरती सेलिब्रिटीला किंवा इन्फ्लुएन्सर एक ड्रिंक पिताना बघितले असेल. ती म्हणजे की माचा टी. सध्या हा जो चहा आहे हा खूप जास्त ट्रेंडिंग आहे. पण नेमका हा माचा टी आहे तरी काय? माचा टी कुठून आला आहे? तर याविषयीचं माहिती आपण जाणून घेणार आहोत.
माचा म्हणजे नेमकं काय
माचा हे जपानी हिरव्या चहाचे एक अत्यंत शुद्ध रूप आहे. हा चहा पारंपरिक हिरव्या चहा प्रमाणे पाण्यात उकळून तयार केला जात नाही, तर चहाची निवडक पाने सावलीत वाढवली जातात आणि नंतर ती वाळवून बारीक पूड केली जाते. हीच पूड म्हणजे माचा पावडर, जी पाण्यात किंवा दुधात मिसळून प्यायली जाते.
advertisement
माचाचे फायदे काय
माचामध्ये कॅटेचिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक काढून टाकायला मदत करतातयामध्ये कॅफीन असते पण कॉफीप्रमाणे ती अचानक झटका देत नाही, तर मृदू पण सातत्याने ऊर्जा देतेमाचा शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे फॅट बर्निंग प्रक्रियेला चालना मिळते. नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होतेतर हे माचा टी असे फायदे होतात. फायदेशीर असा चहा आहे
advertisement
कसा घ्यावा माचा चहा? 
आजकाल बाजारात माचा पावडर सहज उपलब्ध आहे. एक चमचा माचा पावडर गरम पाण्यात किंवा दुधात घालून फेटून प्यायचा असतो. त्याचे आइस्ड लाटे, स्मूदी, इतर पदार्थांमध्ये मिश्रण करून देखील सेवन करता येते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Matcha Tea Benefits: शरीरात राहणार नाहीत विषारी घटक, कधी पिलाय का माचा टी? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement