Health Tips: तरूण दिसायच अन् आजारी पण नाही पडायचं, पावसाळ्यात करा या फळाचं सेवन, Video

Last Updated:

पावसाळ्याच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आपण अनेक आजारांना लवकर बळी पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

+
News18

News18

जालना: पावसाळ्याच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आपण अनेक आजारांना लवकर बळी पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्यासाठी जांभूळ हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर अपचन, ऍसिडिटी, हृदयाशी संबंधित आजार आणि नवतरुण राहण्यासाठी देखील जांभळाची मदत होते. जांभळामध्ये कोणकोणती पोषक तत्वे असतात आणि त्याचा आपल्या शरीराला कसा उपयोग होतो? याबद्दलच आहार सल्लागार डॉ.अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
 जांभळामध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी यासाठी जांभूळ अत्यंत उपयुक्त आहे. जांभळामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विविध आजारांशी लढण्याची शक्ती वाढल्याने आपण लवकर आजारी पडत नाही. त्याचबरोबर वृद्धत्व आणि हृदयाशी निगडित असलेले आजार कमी होण्यास मदत होते.
advertisement
जांभळामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळते. पोटॅशियम हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी आणि मांसपेशींना शक्ती पुरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. व्हिटामिन सी, पोटॅशियम, फायबर विपुल प्रमाणात असल्याने जांभळाचे सेवन विविध आजारांवर प्रभावी ठरते. त्यामुळे बहुगुणी अशा जांभळाचे सेवन आवश्यक करावे, असं आहार सल्लागार डॉ.अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं. 
जांभूळ फळांमध्ये फ्रुक्टोज ही नॅचरल शुगर असते. त्यामुळेच थेट जांभळाच्या सेवनाने साखर नियंत्रणात आणण्यासाठी फारसा फायदा होत नाही. तर जांभूळ बियांमध्ये जांबुलीन आणि जांबोसिन हे घटक असतात. हे घटक स्टार्चला ग्लुकोजमध्ये बदलण्यास रोखतात. त्यामुळे जांभूळ बीज हे डायबिटीज कंट्रोल करण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेहांनी थेट जांभळाचे सेवन करण्याऐवजी जांभूळ बियांच्या पेस्ट दररोज सेवन केल्यास फायदा होऊ शकतो, असं आहार सल्लागार अमृता कुलकर्णी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: तरूण दिसायच अन् आजारी पण नाही पडायचं, पावसाळ्यात करा या फळाचं सेवन, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement