advertisement

Dry day in Maharashtra: महाराष्ट्रात 3 दिवस असणार आहे 'ड्राय डे', काय आहे कारण?

Last Updated:

महाराष्ट्र सरकारने राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रामध्ये तीन दिवस ड्राय डेची घोषणा केली आहे. राज्यामध्ये काही महत्त्वाच्या दिवशी ड्राय डे घोषित केला जातो.

Dry Day In Maharashtra On Mahashivratri On These Dates In February Mumbai Maharashtra And Delhi Will Also Have Completely Dry Day.
Dry Day In Maharashtra On Mahashivratri On These Dates In February Mumbai Maharashtra And Delhi Will Also Have Completely Dry Day.
मुंबई: येत्या रविवारी जर तुमचा मित्रांसोबत पार्टी करायचा काही प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रामध्ये तीन दिवस ड्राय डेची घोषणा केली आहे. राज्यामध्ये काही महत्त्वाच्या दिवशी ड्राय डे घोषित केला जातो. 15 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. कोणकोणत्या पद्धतीने ड्राय डे असणार, एकदा जाणून घेऊया...
राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार, ड्राय डेच्या दिवसांमध्ये कुठेही दारू दिली किंवा विकली जात नाही. ही बंदी वाइन शॉप्स, बार, पब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना लागू होते. धार्मिक प्रसंग, राष्ट्रीय उत्सव आणि निवडणुकींच्या काळामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी ड्राय डे पाळला जातो आणि लागू केलेल्या संपूर्ण ठिकाणी हा दिवस सक्तीने पाळला जातो. महाशिवरात्र येत्या 15 फेब्रुवारीला आहे, या दिवशी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ड्राय डेची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यादिवशी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ड्राय डे असणार आहे.
advertisement
तर 23 फेब्रुवारीच्या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त मुंबई आणि दिल्लीमध्ये ड्राय डे असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. ड्राय डेच्या दिवशी राज्यभरातील मद्यविक्रीची दुकानं, बार, परमिट रुम बंद राहतील. ड्राय डेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Dry day in Maharashtra: महाराष्ट्रात 3 दिवस असणार आहे 'ड्राय डे', काय आहे कारण?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement