तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर आताच थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सध्या फॅशनच्या ओघात अगदी लहान मुलींमध्येही मेकअपचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. परंतु, तज्ज्ञांच्या मते या गोष्टीकडे फक्त सौंदर्याचा भाग म्हणून न पाहता आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करणं आवश्यक आहे.
अमरावती : सध्या फॅशनच्या ओघात अगदी लहान मुलींमध्येही मेकअपचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. शाळेत जाणाऱ्या, फक्त 10-12 वर्षांच्या मुली देखील आय लाइनर, आय शॅडो, लिपस्टिक आणि इतर मेकअप प्रॉडक्टचा वापर करू लागल्या आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओज, स्टाईल आणि पटकन सुंदर दिसण्याची इच्छा यामुळे या वयातच मुली मेकअपकडे आकर्षित होत आहेत. परंतु, तज्ज्ञांच्या मते या गोष्टीकडे फक्त सौंदर्याचा भाग म्हणून न पाहता आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करणं आवश्यक आहे. कारण केमिकल असलेल्या मेकअप प्रॉडक्टमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
नॅचरल ग्लोसाठी शरीरातील अग्नी संतुलित ठेवणे महत्त्वाचं
बहुतेक मेकअप प्रॉडक्टमध्ये केमिकल्स असतात. यांचा वारंवार वापर केल्यास शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती कमी होते. पचनशक्ती बिघडली की, शरीरात उष्णता वाढते आणि त्याचे दुष्परिणाम त्वचेवर त्वरित दिसू लागतात. लहान वयातच पिंपल्स, ब्लॅकहेड्स, अत्याधिक तेलकट त्वचा, तसेच केस गळती यांसारख्या समस्या पाहायला मिळतात. काही मुलींमध्ये तर पाळी अनियमित होणे, अंगात थकवा येणे अशा तक्रारी वाढतात.
advertisement
तज्ज्ञ सांगतात की, चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शरीरातील अग्नी संतुलित ठेवणे. यासाठी हलके, पचायला सोपे अन्न, जास्त पाणी पिणे, वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास त्वचेचं आरोग्य अधिक चांगलं राखता येतं.
advertisement
नैसर्गिक लिपस्टिक, जे आय शॅडो म्हणूनही वापरता येते
घरच्या घरी तयार करता येणारी काही सुरक्षित मेकअप प्रॉडक्ट देखील आहेत. जसे की, घरच्या तुपातले किंवा बदामाच्या तेलातले काजळ, डाळिंबाचा रस आणि बीटरूटपासून तयार केलेले नैसर्गिक लिपस्टिक, जे आय शॅडो म्हणूनही वापरता येतात. काकडीचा रस आणि बऱ्याच अशा नैसर्गिक घटकांनी चेहऱ्याला नॅचरल ग्लो मिळतो आणि त्वचेची अस्सल सुंदरता टिकून राहते.
advertisement
मेकअप प्रॉडक्टचा वापर पूर्णपणे टाळायची गरज नाही, परंतु त्यांच्या वापरात मर्यादा आवश्यक आहे. नॅचरल ग्लो हा मेकअपने नव्हे तर शरीराच्या नैसर्गिकरीत्या आरोग्य राखल्याने होतो. याची जाणीव लहान वयातच झाली तर पुढील आयुष्यात त्वचेच्या समस्या टाळता येऊ शकतात.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 19, 2025 5:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुमच्या घरी देखील लहान मुली मेकअप करतात? तर आताच थांबवा, नाहीतर होतील गंभीर परिणाम

