Dragon Fruit Benefits: हृदयाला पोषक अन् मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर, ड्रॅगन फ्रुटचे हे आरोग्यदायी फायदे पाहून चक्रावून जाल! Video

Last Updated:

Dragon Fruit Benefits: विविध पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असल्याने हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा देखील धोका कमी होतो, असं सांगितलं जातं.

+
News18

News18

जालना: बाजारामध्ये ड्रॅगन फ्रूट मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. ड्रॅगन फ्रूटचे सेवन नियमित केल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विविध पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असल्याने हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा देखील धोका कमी होतो, असं सांगितलं जातं. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने आपल्याला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात? याविषयीच आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
ड्रॅगन फ्रूटचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये मेटालिन नावाचा घटक असतो. मेटालिन हा हृदयाला पोषक असा घटक असल्यामुळे हृदयरोगाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी आवश्यक ड्रॅगन फ्रूटचे सेवन करावे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे मधुमेह असलेल्या पेशंटना फायदा होतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये फिनोलिक ॲसिड, फ्लायनाइड ग्लुटीन सारखे घटक असल्याने अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जे रुग्ण कॅन्सरशी झुंज देत आहेत. जे कॅन्सरने पीडित आहेत अशा रुग्णांनी ड्रॅगन फ्रूटच सेवन आवश्यक करावं.
advertisement
त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असल्यामुळे त्वचेशी निगडित रोग दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या देखील दूर होते. त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर देखील हे फळ परिणामकारक आहे, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dragon Fruit Benefits: हृदयाला पोषक अन् मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर, ड्रॅगन फ्रुटचे हे आरोग्यदायी फायदे पाहून चक्रावून जाल! Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement