advertisement

Health Tips: सारखा अशक्तपणा जाणवतोय? जीवघेण्या आजाराचे लक्षणं तर नाही ना? एकदा वाचाच!

Last Updated:

सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.

+
News18

News18

अमरावती: अलीकडच्या काळात जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यातच एक दुर्मिळ पण गंभीर प्रकार म्हणजे हाडांचा कॅन्सर. या आजाराविषयी समाजात अजूनही फारशी जागरूकता नाही. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर निदान न झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच याविषयी माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे. हाडांचा कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? तसेच काय काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. राऊत यांनी दिली आहे.
हाडांचा कॅन्सर म्हणजे काय?
हाडांचा कॅन्सर हा एक दुर्मिळ आजार असून, यामध्ये हाडांच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊ लागते. त्यामुळे हाड कमजोर, कमकुवत आणि विद्रूप होऊ शकतात. जेव्हा कॅन्सरची सुरुवात थेट हाडांपासूनच होते, त्याला ऑस्टिओसारकोमा असं म्हटलं जातं.
हाडांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती?
हाडांच्या कॅन्सरची सुरुवातीला फारशी लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे तो उशिरा समजतो. खालील लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
1. सतत, वाढती वेदना – विशेषतः रात्री किंवा हालचाली करताना वेदना वाढते.
2. हाडं सहज मोडणं – हाडं कमकुवत होऊन किरकोळ आघातानेही मोडतात.
advertisement
3. हाडाजवळ गाठ किंवा सूज – विशेषतः सांध्याजवळ.
4. अशक्तपणा, थकवा आणि ताप येणे
5. अचानक वजन कमी होणे
हालचालींमध्ये अडथळा येणे, ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वेळेवर निदान आणि उपचाराचे महत्त्व
हाडांचा कॅन्सर सुरुवातीला ओळखला गेला की त्यावर लगेच उपचार सुरू करणे गरजेचे आहे. या आजाराचे एमआरआय, एक्स-रे, बायोप्सी यांसारख्या तपासण्या करून निदान करता येऊ शकते. तसेच केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपीद्वारे यावर उपचार केले जातात.
advertisement
हाडांचा कॅन्सर होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
हाडांचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येईल असे नाही, परंतु काही सतर्कता आणि जीवनशैलीतील सुधारणा करून धोका कमी करता येतो:
1. संतुलित आहार घेणे
हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D, प्रोटीनयुक्त आहार आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, सुकामेवा याचा समावेश करू शकता.
advertisement
2. नियमित व्यायाम करणे
हाडं आणि स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी चालणे, योगा, स्ट्रेचिंग अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे.
3.धूम्रपान व मद्यपान टाळा
हे शरीरातील पेशींवर वाईट परिणाम करतात व कॅन्सरचा धोका वाढवतात. त्यामुळं धुम्रपान टाळणे गरजेचे आहे.
advertisement
4. केमिकल्स व किरणोत्सारापासून बचाव करा
औद्योगिक क्षेत्रात काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करा. त्यामुळे केमिकल्स व किरणोत्सारापासून बचाव करता येऊ शकतो.
5. कौटुंबिक इतिहास असल्यास तपासणी करा
काही प्रकारचे कॅन्सर आनुवंशिक असतात. जोखीम असल्यास वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.
advertisement
6. वेदना दीर्घकाळ असल्यास दुर्लक्ष करू नका
कसलीही गाठ किंवा वेदना दीर्घकाळ असल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच उपचार सुरू करावेत.

view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सारखा अशक्तपणा जाणवतोय? जीवघेण्या आजाराचे लक्षणं तर नाही ना? एकदा वाचाच!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement